स्वत:ला भगवान विष्णूचे अवतार म्हणवणारे बाबा ‘क्लर्क’पासून झाले ‘कल्कि’ महाराज, मिळालं काळ्या पैशांचं ‘घबाड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धर्माच्या नावाखाली भक्तांची बाबा लोकांकडून होणारी फसवणूक सुरुच आहे. यात स्वत:ला विष्णुचा अवतार सांगणारे आणि कल्कि भगवान या नावाने प्रसिद्ध असलेल्या बाबाचा देखील समावेश आहे. या स्वयं घोषित महाराजावर जेव्हा आयकर विभागाने छापेमारी केली तेव्हा त्याच्याकडून 600 कोटींचे अघोषित घबाड मिळाल्याचा खुलासा झाला. आता या स्वयं घोषित बाबाने व्हिडिओ द्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
Money
स्वत:ला कल्कि भगवान घोषित करणाऱ्या विजय कुमार याने व्हिडिओतून माहिती दिली की पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की ना की मी देश सोडला आहे आणि ना की आम्ही कोठे गेलो आहोत. आम्ही येथेच आहोत आणि आमच्या भक्तांना सांगू इच्छितो की आमचे आरोग्य ठीक आहे. सरकारने किंवा आयकर विभागाने की आम्ही देश सोडून गेल्याचे सांगितले नाही. परंतू मिडिया सांगत आहे की आम्ही देश सोडला.

या कल्कि महाराजांचे साम्राज्य आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूसह परदेशात देखील आहे. आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी विजय कुमार याच्या 40 ठिकामी छापेमारी करुन भारतीय रुपयात 44 कोटी रुपये रोख, 18 कोटी रुपयांबरोबर 25 लाख अमेरिकन डॉलर, 26 कोटी रुपयांबरोबर 88 किलो सोन्याचे दागिने, 5 कोटी रुपयांचे 1271 कॅरेटचे हिरे आणि 409 कोटी रुपयांची कमाईच्या पावत्या मिळाल्या.
Police
विजय कुमार 30 वर्षापूर्वी एका लाइफ इंश्योरेंस कंपनीमध्ये क्लर्क म्हणून काम करत होता. परंतू त्यानंतर तो नोकरी सोडून स्वयंघोषित महाराज झाला. 1980 साली जीवाश्रम नावाचा एक आश्रम स्थापन केला आणि येथूनच त्याचा महाराज म्हणून प्रवास सुरु झाला.

या स्वयंघोषित  बाबाचे साम्राज्य भारताबरोबर परदेशात देखील पसरले. बाबाचे साधे दर्शन घ्यायचे झाल्यास 5 हजार आणि विशेष दर्शन हवे असल्यास 25 हजार रुपये शुल्क द्यावे लागते.

Visit : Policenama.com