भारतात बॅन केले गेले पॉप्युलर चीनी अ‍ॅप्स, तुमच्याकडे आता ‘हे’ आहेत पर्याय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात पॉप्युलर अ‍ॅप्सपैकी एक टिक-टॉकला भारतात बॅन करण्यात आले आहे. हे चीन अ‍ॅप असून तेथील कंपनी बायटेडंसने तयार केले आहे. भारतात याचे कोट्यवधी यूजर्स आहेत. अशावेळी हे यूजर्स आपल्या कन्टेंटसाठी दुसर्‍या अ‍ॅपकडे वळू शकतात.

टिक-टॉकप्रमाणेच युसी ब्राऊजरसुद्धा भारतात पॉप्युलर आहे. हे अ‍ॅप अलिबाबाचे आहे जी चीनची सर्वात मोठी कंपनी आहे. हे ब्राऊजर स्मार्टफोन्समध्ये सर्वात जास्त पॉप्युलर आहे, विशेषता चीनी स्मार्टफोन्समध्ये.

चीनी स्मार्टफोन कंपन्या टिकटॉक आणि युसी ब्राऊजर अगोदरच आपल्य फोनमध्ये इन्स्टॉल करून विकतात. आता या अ‍ॅप्सवर बॅन आहे. हे अ‍ॅप काम करतील, परंतु येत्या काही दिवसांत यांचा सपोर्ट बंद होऊ शकतो.

इतरही अनेक पॉप्युलर चीनी अ‍ॅप्स आहेत, ज्यांच्यासाठी पर्याय आजही तुमच्याकडे आहे. म्हणजे जर तुम्ही या अ‍ॅप्सवर अवलंबून आहात तर या अ‍ॅप्सला पर्याय म्हणून दुसरे अ‍ॅप्स ट्राय करू शकता.

क्लिनिंग अ‍ॅप्स –
बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये अनेक क्लिनिंग अ‍ॅप्स आहेत. आपण ते वापरले नाहीत तर काही खास नुकसानही होणार नाही. कंपनीकडून देण्यात येणारे क्लीन अप अ‍ॅप्स काम करतील.

हे आहेत पर्याय

Camscanner – Adobe Scan, Microsoft office Lens, Evernote scannable

UC Browser – Google Chrome, Google News, Mozilla Firefox

TikTok, Bigo Video – Dubsmash, Roposo, Chingari, Mitron

Sharit – Files Go, Dropbox, Apple AirDrop, ShareAll, Jio Switch

Clubfactory Shein – Flipkart, Paytm, Amazon

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like