Pune Hadapsar Crime | पुणे : भररस्त्यात तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव, भावाला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग केला (Molestation Case). याबाबत तरुणीच्या भावाने आरोपीकडे विचारणा केली असता त्याने तरुणीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिली. हा प्रकार मंगळवारी (दि.2) दुपारी साडेचार वाजता हडपसर परिसरात घडला. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 20 वर्षीय पीडित तरुणीने बुधवारी (दि.3) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन श्रवण (पूर्ण नाव माहित नाही रा. म्हाडा कंस्ट्रक्शन, हडपसर) याच्यावर आयपीसी 354(अ), 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला. (Pune Hadapsar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या घरी चालत जात होती.
त्यावेळी आरोपी एका बाकड्यावर बसला होता. आरोपीने तरुणीकडे पाहून ‘ये क्या बोलती तू’ गाणे म्हणू लागला.
तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपी तिच्याजवळ आला.
त्याने अश्लील वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तरुणीने याबाबत भावाला सांगितले.
भावाने आरोपीकडे विचारणा केली असता त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक