सुप्रीम कोर्टातील 6 न्यायाधीशांना ‘स्वाइन फ्लू’, ‘मास्क’ घालून काम करताना दिसले ‘जस्टिस’ संजीव खन्ना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मंगळवारी दिल्लीतील हिंसाचार संबंधित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांना फ्लू झाला आहे, त्यामुळे अनेक खटल्यांची सुनावणी होऊ शकणार नाही. न्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना आणि सर्वोच्च न्यायालयातील कर्मचार्‍यांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, न्यायाधीश H1N1 चे पीडित आहेत. इतकेच नाही तर मंगळवारी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी मास्क घालून कामकाज पहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश चंद्रचूड हे भारताचे मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे (CJI SA Bobde) यांच्याशी या संपूर्ण प्रकरणावर बातचीत केली. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयात काम करणार्‍या व्यक्तींना लसीकरणाच्या सूचना देण्यात याव्या. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सीजेआयने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे (SCBA) अध्यक्ष दुष्यंत दवे यांची भेट घेतली. यानंतर सीजेआयने सांगितले की लसीकरणासाठी दवाखाना उघडला जाईल.

H1N1 फ्लू म्हणजे काय?

तज्ञांच्या मते, H1N1 फ्लूच्या सुरुवातीला ताप येणे, नाक वाहणे, भूक न लागणे, थकवा जाणवणे, घसा खवखवणे, खोकला, उलट्या होणे आणि चक्कर येणे किंवा अशक्तपणामुळे बेशुद्ध होणे हे स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. तसेच तज्ज्ञांनी यापासून संरक्षणासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. उदाहरणार्थ, शिंका येत असताना आणि खोकला येत असताना नाक आणि तोंड झाकून घ्यावे, जर मास्क नसेल तर रुमालाचा वापर करावा, स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, संपूर्ण झोप घ्यावी आणि व्यायाम करावा.

या फ्लूची लक्षणे सामान्य ताप-खोकल्याच्या विषाणूसारखीच आहेत, परंतु काही उपाय आणि प्रयत्नांद्वारे याचा प्रसार होण्यापासून रोखता येतो. या विषाणूला सर्वात आधी लहान मुले बळी पडतात, त्यानंतर वृद्ध आणि दीर्घकाळ उपचार घेत असलेले लोक बळी पडतात. त्यामुळे त्यांनी यापासून विशेष सावधानी बाळगावी.