साप चावल्याने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

पोलिनामा ऑनलाईन – पिंपरी गावठाणात रविवारी रात्री घराजवळ खेळत असताना साप चावल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. कृष्णा अपूर्व राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी गावठाणतील वाघेरे कॉलनीत कृष्णा रविवारी सायंकाळी आपल्या घराजवळ खेळत होता. खेळताना चेंडू एका बिळात गेला. त्याने बिळामध्ये हात घातल्याने सापाने त्यास चावा घेतल्याने कृष्णा जागेवरच बेशुद्ध पडला. दरम्यान नातेवाईकांना घटना कळताच लगेचच कृष्णाला उपचाराकरिता वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

भोसरी पोलिसांनी केला २.२५ लाखाचा ऐवज जप्त

फुल विक्रेत्यांकडून ग्राहकावर कोयत्याने वार

उसने घेतलेले पैसे वेळेत देता न आल्याने, सख्या बहिणींनी केले विष प्राशन