home page top 1

कोल्हापूर : 69 गावठी ‘बॉम्ब’ जप्त, ‘उजळाईवाडी’ स्फोटाशी ‘कनेकशन’ असण्याची शक्यता

कोल्हापूर, पोलीसनामा ऑनलाइन – उजळाईवाडी स्फोटामध्ये ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला होता. विधानसभा निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिस वेगाने तपास करत होते.  उजळाईवाडी टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील दोघा सख्यां भावांच्या घरी 69 गावठी बॉम्ब व साहित्य जप्त करण्यात आले. संशयित विलास राजाराम जाधव (वय 52 ) व आनंदा राजाराम जाधव (54) यांना अटक केलेल्यांची नावे आहेत.

बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य कूठून आणले याशिवाय त्याचा वापर कोठे झाला, त्याची विक्री कोणाला झाली, उजळाईवाडी स्फोटासंबधी यांचा काही संबध आहे काय, याबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य आणि संशयितांकडे मिळून आलेले साहित्य एकाच प्रकारचे आहे. त्यांनी स्फोटके ठेवली होती की ज्यांना विक्री केली त्यांनी ठेवली होती, याबाबत चौकशी सुरु असल्याचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले. संशयितांनी भूईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होतो.

स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल संतोष माने, हरिष पाटील यांना खबºयाकडून माहिती मिळाली की, माले मुडशिंगी येथील विलास जाधव व आनंदा जाधव हे गावठी बॉम्ब बनवून त्यांची विक्री करतात, त्यांना ताब्यात घेऊन दोघांच्या घराची झडती घेतली असता बॉम्ब बनविण्याचे साहित्यासह पांढऱ्या आणि गडद तपकिरी रंगाचे एकूण 69 गावठी तयार बॉम्ब असा सुमारे 7 हजार किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दोघा संशयितांकडे कसून चौकशी केली. सल्फर, पोर्टशियम पावडर, गारगोटीचे खडे इत्यादी साहित्य वापरुन गावठी बॉम्ब बनवित असलेची कबुली दिली. बॉम्बला रक्तीच्या आवरणाचा वापर करुन रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्याचा वापर करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य अशाचप्रकारे आहे. त्यांचेकडून या साहित्याची विक्री झालेची शक्यता आहे. त्यांनी हे साहित्य उड्डाणपुलाखाली ठेवले होते की इतर कोणी एखाद्याने याबाबत पोलीस त्यांचेकडे चौकशी करत आहेत.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like