मोदींच्या कार्यकाळात १० पैकी ७ जण सुरक्षित : गॅलप वर्ल्डचा अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंसथा – लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपला असून देशातील प्रचाराचा जोर अधिकच वाढला आहे. या लोकसभा निवडणुकीत सुरक्षेचा मुद्दा सर्वच पक्षांनी लावून धरत यावर राजकारण सुरू केले आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचे भांडवल भाजपा नेत्यांकडून प्रचारासाठी करण्यात येत असातानाच जगप्रसिद्ध गॅलप वर्ल्ड पोल या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार रात्री बाहेर फिरताना १० पैकी ७ लोक स्वत:ला सुरक्षित समजतात.

महिला सुरक्षा, राष्ट्र सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारण्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहे. गॅलप वर्ल्ड पोलच्या सर्वेक्षणानूसार भारतीय लोकांना रात्री फिरताना स्वत:ला सुरक्षित असल्याचे वाटते. नरेंद्र मोदी यांचे २०१४ साली सरकार आले. मोदी भारताचे पंतप्रधान झाले. ते पंतप्रधान झाल्यानंतर १० पैकी ७ लोकांना रात्री फिरताना सुरक्षित असल्यासारखे वाटते. गॅलप वर्ल्ड पोल जगभरातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर सर्वेक्षण करते. त्यांनी २००५ पासून अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सर्वेक्षण केले आहे. गॅलपने भारतामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये व्यक्तीगत सुरक्षेपेक्षा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो. या सर्वेनुसार १०१७ मध्ये देशात एक हजार दहशतवादी हल्ले झाले. जगभरात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताच्या पुढे इराक आणि अफगाणिस्तान या देशांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो.

गॅलप सर्वेक्षणानुसार सुरक्षेसंदर्भात ग्रामीण आणि शहरी भारतीयांची मते वेगवेगळी आहेत. पूर्व भारतातील ७८ तर दक्षिण भारतातील ७५ टक्के नागरिक रात्री बाहेर फिरताना स्वत:ला सुरक्षित समजतात. तर ६० टक्के उत्तर भारतीयांना सुरक्षित वाटते.