71 वर्षीय ‘नंबरी’ वृध्दानं केला 24000 वेळा ‘कॉल’, ‘गोत्यात’ आल्यानंतर आजोबांकडूनच कारवाईची ‘डिमांड’

टोकियो : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपन्या तक्रार आणि सुचनांसाठी अनेकदा ग्राहकांना टोल फ्री क्रमांकाची सुविधा देत असतात. मात्र एका आजोबांनी  या सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. कारण त्यांनी आपली  तक्रार नोंदवण्यासाठी कंपनीला तब्बल 24000 फोन केले. त्यामुळे कंपनीने त्यांच्याविषयी तक्रार दाखल केली. कंपनीच्या तक्रारीवरून त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली  आहे. एकिटोशो ओकमोटो (वय -71) असे या व्यक्तीचे नाव असून ते जापान येथील सैतामा येथे राहतात.

एकिटोशो ओकमोटो यांना ‘व्यवसायात अडचणी’ आणण्यासाठी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, मागील 2 वर्षात त्यांनी एका टेलिकॉम कंपनीला 24000 वेळा कॉल केला आहे. ते कंपनीच्या सर्विसमुळे नाराज होते व सर्विस प्रोव्हाइडरला माफी मागण्यास सांगत होते. ते सतत रेडिओ ब्रॉडकास्ट सर्व्हिसचा वापर करू शकत नसल्याची तक्रार करत होते. एकिटोशी कर्मचाऱ्यांना कॉल करून म्हणायचे की, माझ्याकडे या आणि कराराचे उल्लंघन करणे व अयोग्य व्यापार करण्यासाठी माफी मागा.

सुरुवातीला कंपनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांचे सारखे कॉल येऊ लागल्याने कंपनीने  पोलिसांत तक्रार दिली.त्यांच्या सतत फोन करण्याने कंपनीचे कर्मचारी दुसऱ्या ग्राहकांचे फोन घेऊ शकत नव्हते असे  कंपनीचे म्हणणे आहे.  कंपनीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्यांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे एकिटोशी यांचे म्हणणे आहे की, ते या प्रकरणात पिडीत आहेत व कंपनीवर कारवाई व्हावी.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like