मोदी सरकारच्या गेल्या ३ वर्षाच्या काळात ७३३ दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधील वातावरण चढउताराचे होते. गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील तणाव आणि तेथे मारलेल्या दहशतवाद्यांचा आकडा सांगितला आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत एकूण ७३३ दहशतवादी मारले आहेत.

२०१९ या वर्षात १६ जूनपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या ११३ इतकी आहे. २०१६ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळात अनुक्रमे १५०, २१३ आणि २५७ इतके दहशतवादी मारण्यात आले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली आहे.

सरकारने दहशतवादाबाबत अवलंबलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांचे कट उधळून लावण्यासाठी सज्ज आहे. आपल्या यंत्रणांकडून दहशतवादाविरोधी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जात आहे. त्यामु‌ळे जीवितहानीचे प्रमाणही कमी झाल्याचे त्यांनी सांगितलं.

सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा मोहिमा अधिक मजबूत केल्या जात आहेत. यंत्रणांमधील परस्पर समन्वय सुधारणे आणि दहशतवादी कृत्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणे अशी पावले उचलण्यात आली आहेत, असंही त्यांनी सांगितलं. दहशतवाद्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात असून त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जम्मू-काश्मिरमधील तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, क्रीडाविषयक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणे, ‘यूथ एक्स्चेंज प्रोग्राम’ या प्रकारचे काही उपाय योजले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसंच २०१६ ते २०१८ या काळात या भागात दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये अनुक्रमे ८२, ८० आणि ९१ एवढे जवानांना शहिद झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

आरोग्य विषयक वृत्त

WHO ने सांगितलं एंटिबायोटिकचा वापर कसा करायचा

या ट्रिक्स फॉलो केल्यास ऑफिसमध्ये तुम्हाला कधीच बोअर होणार नाही

खोबरेल तेल वापरा आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवा

ज्ञानमुद्रेद्वारे जागृत होऊ शकते तुमची सुप्तशक्ती !