Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’ संशयितांसाठी उपचारासाठी 74 ‘फ्लू क्लिनिक’ सुरु, इथं पाहा संपुर्ण यादी

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई आणि पुणे येथे ही संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. पुण्यात वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पुणे शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत ७४ दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात ही रुग्णालये कोणती आणि कोठे आहेत त्याची यादी देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे की , कोणत्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, घसा दुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास घाबरुन न जाता आपलया नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रसिद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये जाऊन तपासणी आणि उपचार करून घेण्यात यावेत

पुण्यात वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

१ एप्रिल रोजी पुण्यात कोरोना बाधितांची संख्या ५१ इतकी होती. १५ दिवसात ती ३६९ पर्यंत जाऊन पोहचली आहे. गेल्या १५ दिवसात पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल ३११ ने वाढली आहे. १ एप्रिलला एकूण ५१ कोरोना पॉझिटिव्ह होते, जवळपास तेवढे दररोज नव्याने आढळून येत आहे. १५ एप्रिलला तर त्यापेक्षा जास्त ५३ नवीन कोरोना बाधित दिवसभरात आढळून आले. पुण्यात कोरोनाने गुणाकार सुरु केलेल्याचे हे लक्षण दिसत आहे. पुण्यात १५ एप्रिलला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण ३७७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील आकडा ३०८१ वर

महाराष्ट्रात नव्या १६५ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. महत्वाची बाब म्हणजे यापैकी १०७ मुंबई येथील आहेत. आज अपडेट झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई येथे सर्वाधिक नव्या १०७ रुग्णांची नोंद झाली आहे. माहितीनुसार नवी मुंबई -२ ,वसई विरार -२, ठाणे जिल्हा -१,ठाणे -३, पीएमसी -१९, पीसीएमसी -४,पनवेल -१,नागपूर -११,एमसीजीएम-१०७, मालेगाव -४, चंद्रपूर -१, अहमदनगर -१ महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधिताची संख्या अशी आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ३०८१ वर गेला आहे.