Homeताज्या बातम्या7th Pay Commission | फक्त 12 दिवस आणखी ! सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात...

7th Pay Commission | फक्त 12 दिवस आणखी ! सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढतील 27000 रुपये, मोदी सरकार करणार घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना (central government employees news) आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील महिन्यात सरकार महागाई भत्ता (dearness allowance) वाढवू शकते. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, सरकार बुधवार, 3 ऑगस्ट रोजी होणार्‍या कॅबिनेट बैठकीत डीए वाढवण्याबाबत (DA Hike) चर्चा करू शकते. (7th Pay Commission)

 

म्हणजेच कर्मचार्‍यांचा DA वाढण्यास 12 दिवस उरले आहेत. मे महिन्यात एआयसीपीआय इंडेक्स वाढल्यामुळे 4 टक्के डीए वाढण्याची अपेक्षा वाढली आहे. असे झाल्यास कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवरून 38 टक्के होईल. असे झाल्यास कर्मचार्‍यांच्या पगारात 27 हजारांहून जास्त वाढ होऊ शकते.

 

DA वाढणार
खरे तर, ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्सचा डेटा 127 अंकांपेक्षा जास्त राहिला आहे. अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (AICPI) डेटाच्या आधारे डीए निश्चित केला जातो. जूनची आकडेवारी येणे बाकी आहे. हेही जास्त राहिल्यास ऑगस्ट महिन्यात महागाई भत्ता वाढण्याची खात्री आहे. (7th Pay Commission)

 

38% होईल डीए
केंद्र सरकारच्या ज्या कर्मचार्‍यांना 34 टक्के डीए मिळत होता, त्यांना आता 38 टक्के डीए मिळणार आहे.

38 टक्के झाल्यास पगार इतका वाढेल
कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, 38 टक्के महागाई भत्ता असल्यास त्यांना 21,622 रुपये डीए मिळेल.
सध्या 34 टक्के दराने 19,346 रुपये मिळत आहेत. डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच वर्षाला सुमारे 27,312 रुपयांची वाढ होणार आहे.

 

50 लाख कर्मचार्‍यांना होईल फायदा
सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने डीएमध्ये एकदाच वाढ केली आहे.
सध्या डीए 34 टक्के आहे. त्यात आणखी 4 टक्क्यांची वाढ झाली तर ती 38 टक्के होईल.
या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून जास्त सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission 4 percent dearness allowance da hike in august salary increase of central govt employees pm narendra modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News