7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! बेसिक सॅलरी ‘या’ फॉर्म्युलावर वाढवणार सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. वेतन आयोगामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ (Salary Hike) होणार नसून, लवकरच नवा फॉर्म्युला ठरणार असल्याच्या बातम्या येत आहेत. जराएचे म्हणणे आहे की, आता सॅलरीसाठी पुढील वेतन आयोग व्हावा, याची तशी शक्यता कमीच आहे, मात्र कर्मचार्‍यांच्या पगारासाठी फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) फॉर्म्युल्याचा विचार होत आहे.

 

कधी लागू होणार नवीन फार्म्युला ?
सरकारने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी सरकार 2024 नंतर हा नवीन फॉर्म्युला लागू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनुसार, दरवर्षी केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार नव्या फॉम्युलानुसार ठरवले जातील. या आधारावर वार्षिक पगार वाढवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. (7th Pay Commission)

 

काय आहे नवीन फॉर्म्युला, जो चर्चेत आहे
कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासाठी सरकार Aykroyd फॉर्म्युलावर चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सरकारी कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन (Minimum Basic Salary) फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते.

 

यावर वर्षात दोन वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात Dearness allowance (DA) सुधारणा केली जाते.
आता नवा फॉर्म्युला ठरवला तर पगार महागाई (Inflation rate) चा दर, राहणीमानाचा खर्च आणि कर्मचार्‍यांच्या कामगिरीशी (Performance) जोडला जाईल.

 

7th Pay Commission च्या शिफारशीच्या वेळी, न्यायमूर्ती माथूर यांनी सूचित केले होते की पे – स्ट्रक्चर नवीन फॉर्म्युलाकडे (Aykroyd Formula) न्यायचे आहे.
यामध्ये कर्मचार्‍यांचा दैनंदिन खर्च लक्षात घेऊन वेतन निश्चित केले जाते.
Aykroyd फॉर्म्युला लेखक वॉलेस रुडेल आयक्रोयड (Wallace Ruddell Aykroyd) यांनी दिला होता.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission big announcement on fitment factor hike for govt employees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा