7th Pay Commission | दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळू शकतात 3 मोठे गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | दिवाळीला केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकार तीन मोठ्या भेट देऊ शकते. यापूर्वी यावर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारद्वारे कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये वाढ केली होती. यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता तीन मोठ्या भेटींमुळे आणखी दिलासा मिळण्याची आशा (7th Pay Commission) आहे.

पहिली भेट कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याशी (DA) संबंधित आहे, जो पुन्हा एकदा वाढू शकतो. दुसरी डीए थकबाकीवर सरकार सोबत चर्चा सुरू आहे.
तर तिसरी भेट भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित आहे. पीएफवर व्याज दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होऊ शकते. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

DA मध्ये वाढ

जुलै 2021 मध्ये झालेली महागाई भत्त्यातील (DA) वाढ किती टक्के आहे हे ठरलेले नाही.
परंतु एआयसीपीआयच्या एका रिपोर्टच्या आकड्यावरून समजते की, यामध्ये 3% पर्यंत वाढ होऊ शकते.
अशाप्रकारे 3% वाढल्यानंतर डीए 31 टक्केपर्यंत जाईल. तर आता केंद्र सरकार दिवाळीच्या जवळपास डीए वाढवण्याची घोषणा करू शकते.

डीए थकबाकीवर चर्चा

मागील 18 महिन्यांपासून सरकारी कर्मचार्‍यांचा डीए प्रलंबित आहे. दिवाळीपर्यंत ही थकबाकी मिळू शकते.
सध्या यावर मोदी सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. मोदी सरकारने मे 2020 मध्ये डीए वाढ 30 जून 2021 पर्यंत रोखली होती. ज्याची थकबाकी अजून दिलेली नाही.

पीएफच्या व्याजाचे पैसे जमा होऊ शकतात

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटीपेक्षा जासत खातेधारकांच्या पीएफ खात्यात लवकरच व्याजाचे पैसे येऊ शकतात.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission central employees can get three big gifts before diwali check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत मोदी सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येतील पैसे?

CM Uddhav Thackeray | ‘गरम पाण्याच्या नावाखाली कोमट पाणी’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणावर ‘मनसे’चा निशाणा

Pune Crime | पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा ! छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की; 7 जणांना अटक