7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना DA बाबत मिळणार चांगली बातमी, ‘या’ कर्मचार्‍यांच्या भत्त्यात 14% वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) म्हणजेच DA आणि पेन्शनधारक (Pensioners) महागाई मदत म्हणजेच डीआरची वाट पाहत आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास, होळीपूर्वी (Holi Festival 2022) सरकार DA आणि DR मध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. (7th Pay Commission)

 

कोणत्या कर्मचार्‍यांच्या भत्त्यात झाली वाढ :
दरम्यान, अलीकडेच केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील (CPSEs) कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, CPSEs चा बोर्ड स्तर किंवा बोर्ड स्तराखालील अधिकारी किंवा पर्यवेक्षकांना मिळणार्‍या महागाई भत्त्याचे दर बदलण्यात आले आहेत.

 

या अंतर्गत महागाई भत्त्यात 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. आता या कर्मचार्‍यांचा भत्ता 184.10 टक्के झाला आहे जो आतापर्यंत 170.50 टक्के होता. हा वाढीव दर 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये सुमारे 11 टक्के वाढ झाली होती.

 

केंद्रीय कर्मचार्‍यांना प्रतीक्षा :
केंद्र सरकारचे कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत.
वास्तविक, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते.
या अंतर्गत, 2022 च्या पहिल्या सहामाहीसाठी भत्ता जाहीर केला जाईल. (7th Pay Commission)

 

सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचा भत्ता 31 टक्के आहे, तो वाढवून 34 टक्के केला जाऊ शकतो.
त्याचप्रमाणे पेन्शनधारकांना मिळणारी महागाईचा मदतही 3 टक्क्यांनी वाढू शकते.
याचा फायदा 47 लाख 14 हजार केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार पेन्शनधारकांना होणार आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission good news for central govt employees da and dr cpses get 14 percent hike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Dhule | 4 हजाराची लाच घेताना पोलिस नाईक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Pune NCP | बंडातात्या कराडकर यांच्या विधानाचा पुणे राष्ट्रवादीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करुन निषेध

 

Cast India | कास्ट इंडिया : माध्यम क्षेत्रातील उद्योजक आणि सर्जनशील व्यावसायिक यांना एकत्र आणणारे स्टार्टअप व्यासपीठ