7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकतात एकाचवेळी 3 गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या नवीन अपडेट

नवी दिल्ली : 7th Pay Commission | दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (central government employees) मोठी खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी एकाच वेळी तीन मोठे गिफ्ट मिळू शकतात. पहिली भेट महागाई भत्त्याशी संबंधित आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये (dearness allowance) 3 टक्केची वाढ होऊ शकते. दुसरी भेट DA एरियरबाबत (7th Pay Commission) असू शकते.

डीए एरियर (7th Pay Commission) बाबत कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून काहीतरी तोडगा निघू शकतो. तर तिसरी भेट प्रॉव्हिडंट फंडसंबंधीत (PF) आहे. या अंतर्गत पीएफवर व्याज दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होऊ शकते.

डीए (DA) मध्ये 3 टक्के वाढ होऊ शकते.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात आता 3 टक्के वाढ होणार आहे. यावर्षीच्या दुसर्‍या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची घोषणा होणे बाकी आहे. सरकार दोन हप्त्यात महागाई भत्त्याची घोषणा करते. पहिली जानेवारी आणि दुसरी जुलै. जानेवारी 2021 मध्ये महागई भत्ता 4 टक्के वाढला होता. याची घोषणा जुलैमध्ये 11 टक्के वाढलेल्या DA मध्ये करण्यात (7th Pay Commission) आली होती.

जुलै 2021 चा DA वाढवणे बाकी

2020 पासून लावलेला प्रतिबंध हटवल्यानंतर महागाई भत्ता 17 टक्केवरून वाढून 28 टक्के झाला. परंतु, सध्या जुलै 2021 चा DA वाढवणे बाकी आहे. केंद्र सरकार याची घोषणा दिवाळीच्या जवळपास करू शकते. जर असे झाले तर महागाई भत्ता 28 टक्के वाढून 31 टक्के होईल.

Gold Price Update | ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! 8000 रुपयांपर्यंत ‘स्वस्त’ मिळतेय सोने, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

इंडेक्स 121.7 वर पोहचला

माहितीनुसार, दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 3 टक्के आणखी वाढू शकतो.
कारण AICPI इंडेक्सचे आकडे आले आहेत. इंडेक्स 121.7 वर पोहचला आहे.
अशावेळी जून 2021 साठी डीएमध्ये 3 टक्केची वाढ होणे निश्चित आहे. जून 2021 च्या इंडेक्समध्ये 1.1 अंकाची वाढ झाली आहे, ज्यामुळे तो 121.7 वर पोहचला आहे.

सॅलरीत पुन्हा होईल चांगली वाढ

अशाप्रकारे एकुण डीए 31.18 टक्के होतो. परंतु, डीएचे पेमेंट राऊंड फिगरमध्ये होते. अशावेळी DA 31 टक्केच मिळेल. आता पुन्हा 3 टक्के वाढीनंतर महागाई भत्ता 31 टक्केच्या स्तरावर पोहचेल. म्हणजे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत पुन्हा एकदा चांगली वाढ होईल.

सरकार लवकरच करू शकते घोषणा

CM सेक्रेटरी (स्टाफ साईड) शिव गोपाळ मिश्रा यांचे म्हणणे आहे की, लवकरच सरकार याबाबत घोषणा करू शकते आणि निश्चितपणे सरकार कर्मचार्‍यांसाठी मोठा दिलासा देईल.

महागाई भत्ता होईल 31 टक्के

केंद्राने जुलैमध्ये महागाई भत्ता 17 टक्केने वाढवून 28 टक्के आणि हाऊस रेंट अलाऊन्स 24 टक्केने वाढवून 27 टक्के केला होता. आता केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता पुन्हा 3 टक्के वाढेल. यामुळे तो वाढून 31 टक्के होईल.

Indian Navy Recruitment 2021 | 12 वी पास तरूणांसाठी इंडियन नेव्हीत 2500 पदांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स

डीए एरियरवर निघू शकतो तोडगा

केंद्रीय कर्मचार्‍यांचा 18 महिन्यांपासून पेंडिंग डीए एरियरचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यापर्यंत पोहचले आहे.

अपेक्षा आहे की, पंतप्रधान दिवाळीपूर्वी यावर मोठा निर्णय घेऊ शकतात.
दिवाळीपूर्वी महागाई भत्ता मिळेल अशी आशा कर्मचार्‍यांना आहे.
अर्थ मंत्रालयाने कोरोना महामारीमुळे मे 2020 मध्ये डीए वाढ 30 जून 2021 पर्यत रोखली होती.

पीएफ (PF) च्या व्याजाचे पैसे सुद्धा मिळतील

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटीपेक्षा जास्त खातेधारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी व्याज येऊ शकते.
पीएफ खाताधारकांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात.
ईपीएफओ आपल्या ग्राहकांच्या खात्यात 2020-21 साठी लवकच व्याज ट्रान्सफर करण्याची घोषणा करू शकते.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या भवानी पेठेतील सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यावरुन दोघे ज्येष्ठ हातघाईवर; एकमेकांना मारहाण

Ration Card | सरकारी दुकानांतून अपात्र लोकसुद्धा घेताहेत रेशन, नियमात होणार बदल; जाणून घ्या सविस्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  7th Pay Commission | 7th pay commission latest news updates central government employees may get da hike pf interest money and da arrears

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update