Pune Crime | पुण्याच्या भवानी पेठेतील सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यावरुन दोघे ज्येष्ठ हातघाईवर; एकमेकांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यासारख्या शहरात सोसायटीमध्ये कुत्री, मांजरी पाळण्यावरुन वरचेवर भांडणे होत असतात. असे असताना एकाने चक्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यास सुरुवात केली. त्याला एका ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतला. त्यावरुन या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. दोघांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या असून खडक पोलिसांनी (Khadak Police Station) दोघांना अटक केली (Pune Crime) आहे.

इक्बाल मोहमंद गौस (वय ४७, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. र. नं. ३८२/२१) दिली आहे. त्यावरुन अजिम जमीर खान (वय ६७) यांना पोलिसांनी अटक (Pune Crime) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकाच इमारतीमध्ये राहतात. गौस यांनी त्यांच्या सोसायटीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये विनापरवाना गायी पाळल्या आहेत. त्याविरुद्ध खान यांनी तक्रार अर्ज दिला होता. याचा गौस यांनी जाब विचारल्यावर त्याचा राग येऊन खान यांनी लोखंडी रॉडने मारहाण करुन फिर्यादी यांच्या रिक्षाची तोडफोड करुन ५ हजार रुपयांचे नुकसान केले.

अजिम जमीर खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी इक्बाल मोहमंद गौस यांना अटक केली आहे.
गौस यांनी गायी पाळल्याबाबत तक्रार अर्ज केला होता.
त्या कारणावरुन गौस याने शनिवारी रात्री साडेआठ वाजता खान यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) करुन लोखंडी रॉडने मानेवर,
चेहर्‍यावर मारुन जखमी केले. या भांडणात खान यांचा मोबाईल व चष्मा गहाळ झाला. खडक पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Two senior handcuffs for raising cows in the Society’s parking lot at Bhavani Peth, Pune; Beating each other

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Navy Recruitment 2021 | 12 वी पास तरूणांसाठी इंडियन नेव्हीत 2500 पदांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स

Gold Price Update | ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! 8000 रुपयांपर्यंत ‘स्वस्त’ मिळतेय सोने, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

Pune Crime | पुण्यात ऑर्केस्ट्रामधील गायिकेवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; शारिरीक संबंधाचे फोटो-व्हिडिओ काढून धमकावत केला बलात्कार