7th Pay Commission | 31 % DA झाल्यानंतर 56000 रुपये बेसिक पगार घेणार्‍यांना वर्षात मिळतील 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी (central government employees) खुप दिवसांपासून महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत. प्रत्यक्षात ही प्रतीक्षा त्या महागाई भत्त्याची आहे जो एआयसीपीआयचे आकडे आल्यानंतर जुलै 2021 च्या हप्त्याचा आहे. ज्या अंतर्गत 3 टक्के महागाई भत्त्याची (7th Pay Commission) वाढ होऊ शकते.

जर असे झाले तर केंद्रीय कर्मचार्‍यांचा एकुण महागाई भत्ता 31 टक्के (7th Pay Commission) होईल.
जर एखाद्या कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 56 हजार रुपये आहे.
तर 31 टक्केच्या हिशेबाने त्याचा वार्षिक महागाई भत्ता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त होईल.
हे पूर्ण कॅलक्युलेशन जाणून घेवूयात…

3 टक्के पर्यंत होऊ शकते वाढ

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात आता 3 टक्के वाढ होणार आहे. यावर्षीच्या दुसर्‍या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची घोषणा होणे बाकी आहे.
सरकार दोन हप्त्यात महागाई भत्त्याची घोषणा करते. पहिली जानेवारी आणि दुसरी जुलै. जानेवारी 2021 मध्ये महागई भत्ता 4 टक्के वाढला होता.
याची घोषणा जुलैमध्ये 11 टक्के वाढलेल्या DA मध्ये करण्यात आली होती.
2020 पासून लावलेला प्रतिबंध हटवल्यानंतर महागाई भत्ता 17 टक्केवरून वाढून 28 टक्के झाला.
परंतु, सध्या जुलै 2021 चा DA वाढवणे बाकी आहे. केंद्र सरकार याची घोषणा दिवाळीच्या जवळपास करू शकते.
जर असे झाले तर महागाई भत्ता 28 टक्के वाढून 31 टक्के (7th Pay Commission) होईल.

 

वार्षिक किती होईल डीए

सध्या महागाई भत्ता 28 टक्के आहे. एखाद्या केंद्रीय कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 56 हजार रुपये असेल तर सध्या 28 टक्केच्या हिशेबाने प्रति महिना महागाई भत्ता 15680 रुपये असेल.
जर संपूर्ण वर्षाचा विचार केला तर 1,88,160 रुपये होईल. तर महागाई भत्ता 31 टक्के झाला तर 56 हजार रुपये बेसिक घेणार्‍यांना 17360 रुपये होईल.
तर वर्षात कर्मचार्‍यांना महागाई भत्ता म्हणून एकुण 2,08,320 रुपये मिळतील. म्हणजे वार्षिक आधारावर 20160 रुपयांचा फरक येईल.

एक कोटीपेक्षा जास्त लोकांना होईल फायदा

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने एक कोटीपेक्षा जास्त लोकांना लाभ मिळेल. ज्यामध्ये 50 लाखापेक्षा जास्त सध्या काम करत असलेले केंद्रीय कर्मचारी आहेत.
तर दुसरकडे 65 लाखापेक्षा जास्त ते लोक आहेत जे केंद्रीय कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत.
आता तुम्ही समजू शकता की, सध्या डीएचे (DA) महत्व किती वाढले (7th Pay Commission) आहे.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission on having 31 percent da those who get basic of rs 56000 will get rs 2 lakh in a year know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘सिक्स पॅक’साठी बेकायदा औषधांची विक्री ! पुणे पोलिसांकडून चार जणांना अटक; औषधाच्या 211 बाटल्या आणि कार जप्त (व्हिडीओ)

Worli Atria Mall | ‘हिजाब’ घातल्याने महिलेला Resto रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

NCP MLA Ashok Pawar | राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी (व्हिडिओ)