Pune Crime | ‘सिक्स पॅक’साठी बेकायदा औषधांची विक्री ! पुणे पोलिसांकडून चार जणांना अटक; औषधाच्या 211 बाटल्या आणि कार जप्त (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | चित्रपटामधील ‘सिक्स पॅक’ अ‍ॅब्ज असणाऱ्या हिरोंना पाहून त्यांच्यासारखीच बॉडी बनवण्याची इच्छा अनेकांना असते. त्यातून सिक्स पॅक व्हायचे वेध लागतात आणि जिममध्ये जाऊन घाम गाळून चित्रपटातील हिरो प्रमाणे बॉडी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याचवेळी लवकरात लवकर रिझल्ट मिळवण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. मात्र ही औषधे घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्यास सांगितले जाते. परंतु याकडे दुर्लक्ष करुन बेकायदा औषधे खरेदी केली जाते. अशाच बेकायदा औषध विक्री (illegally selling) करणाऱ्या चार जणांना पुण्यात (Pune Crime) अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi police) चार जणांना अटक करून औषधाच्या 211 बाटल्या आणि कार जप्त केली आहे.

परेश निवृत्ती रेणुसे Paresh Nivruti Renuse(वय 33, रा. संभाजीनगर, धनकवडी), प्रवीणसिंग पुकसिंग भाटी Praveen Singh Puksingh Bhati (वय 23,रा. दांगट पाटील नगर, शिवणे),
अक्षय संभाजी वांजळे Akshay Sambhaji Wanjle (वय 26,रा. गणपती माथा, वारजे माळवाडी), शौनक प्रकाश संकपाळ Shaunak Prakash Sankapal (वय 28, रा. बहिरटवाडी, शिवाजीनगर)
अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची (Pune Crime) नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात एकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शरीरसौष्ठव व शरीरयष्टी वृद्धीसाठी मेंफरटाईन सल्फेट इंजेक्शनची
(mefertine sulfate injection) बेकायदा विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे (API Praveen Kalukhe) यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून परेश रेणुसेला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 6 बाटल्या जप्त केल्या. रेणुसेकडे सखोल चौकशी केली असता त्याने हे औषध शौनक संकपाळ याने विक्री करण्यासाठी दिली असल्याचे सांगितले.

 

दरम्यान, या घटनेची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक अतिश सरकाळे (Food and Drug Inspector Atish Sarkale) यांना देण्यात आली.
सरकाळे यांनी पोलिसांनी जप्त केल्या औषधांची तपासणी केली.
त्यावेळी रेणुसे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदा औषधाची विक्री करत असल्याचे समोर आले.
तपास मिळालेल्या माहितीनंतर आरोपी भाटी, वांजळे, संकपाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 211 बाटल्या आणि एक कार जप्त करण्यात आली.
आरोपींविरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे (Senior Police Inspector Sunil Zaware), पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर ( Police Inspector (Crime) Anita Hivarkar), सहाय्यक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग (PSISanjay Adling), सचिन फुंदे, संतोष जाधव, नितीन धोत्रे तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागातील निरीक्षक अतिश सरकाळे यांनी ही कारवाई केली.

 

Web Title : Pune Crime | Illegal sale of drugs for ‘Six Pack’! Pune police arrest four; 211 bottles of drugs and cars seized (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Worli Atria Mall | ‘हिजाब’ घातल्याने महिलेला Resto रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Bacchu Kadu | बच्चु कडू यांचा ‘मविआ’ सरकारला घरचा आहेर; म्हणाले – ‘सरकारनं एक तरी पारदर्शक काम करावं’

Radhakrishna Vikhe Patil | ‘नगरच्या एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरलाय’ (व्हिडीओ)