7th Pay Commission | नववर्षात सरकारी कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात होणार मोठी वाढ! 35,510 रुपयांपर्यंत वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | नवीन वर्ष 2022 केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (central government employees) लाभदायक ठरणार आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत या कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ (Salary Hike) होऊ शकते. केंद्र सरकार कर्मचार्‍यांच्या DA सोबत (Dearness Allowance) प्रवास भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची चर्चा आहे, जी यापूर्वी 2016 मध्ये वाढवण्यात आली होती. (7th Pay Commission)

 

यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात 8,000 रुपयांनी वाढ होईल आणि मूळ वेतन 26,000 रुपये होईल. 2016 मध्ये जेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढवला गेला तेव्हा किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले.

 

DA किती वाढू शकतो
सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 31 टक्के मूळ वेतनावर महागाई भत्ता दिला जात आहे. त्याचबरोबर अनेक संघटनांनी ऑक्टोबरमधील वाढीव महागाई भत्त्यानंतर पुन्हा एकदा नवीन वर्षात महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली आहे.

 

त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना यंदा नवीन वर्षात 2 ते 3 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तीन टक्के वाढ दिल्यास 34 टक्के हिशेबाने कर्मचार्‍यांना महागाई भत्ता दिला जाईल. म्हणजेच पगारात 8,840 रुपयांनी वाढ होणार आहे.

प्रवास भत्ताही वाढेल
कर्मचार्‍यांच्या पगारातील महागाई भत्ता, घरभाडे भत्ता (HRA) आणि फिटमेंट फॅक्टर वाढवल्याने प्रवास भत्ताही वाढवला जाऊ शकतो. नवीन वर्षात त्यात 2 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, प्रवास भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली तर हिशोबानुसार कर्मचार्‍यांना दरमहा 1350 रुपयांची वाढ मिळेल. (7th Pay Commission)

 

पगार किती येणार?
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या किमान पगारात फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे मूळ वेतन 26000 रुपये होणार आहे.
यानंतर, महागाई भत्त्यावर 34 टक्के डीए 8,840 रुपये मिळतील.
याशिवाय जर यात 1350 रुपये प्रवास भत्ता जोडला तर दरमहा किमान मासिक वेतन 35,510 रुपये होईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission there will be a big increase in the minimum salary of central employees rs 35510 detail here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO e-Nomination | EPFO ने वाढवली ई-नॉमिनेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Kirit Somaiya | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सोमय्यांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘पवार आणि ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं’

New Year Celebration | नवीन वर्षाच्या उत्सवात भान हरवू नका ! ‘या’ चुकांमुळे तुमच्या घरात येऊ शकतो कोरोना व्हायरस