7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! 20 हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो फायदा; समजून घ्या गणित

नवी दिल्ली : 7th Pay Commission | नवीन वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central government employees) सॅलरीत वाढीची (Salary Hike) शक्यता आहे. काही रिपोर्टनुसार कर्मचार्‍यांना मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. कारण महागाई भत्त्यामध्ये (DA) तीन टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच एचआरएमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. याशिवाय फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर सुद्धा चर्चा केली जात आहे. जर असे झाले तर कर्मचार्‍यांना मोठा लाभ मिळू शकतो. (7th Pay Commission)

 

आता केंद्रीय कर्मचार्‍यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जो नवीन वर्षात 3 टक्के आणखी वाढवण्याची शक्यता आहे. AICPI इंडेक्सच्या आकड्यांनुसार, 3% डीए वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशावेळी डीए 34 टक्के झाला तर कर्मचार्‍यांच्या सॅलरीत 20 हजार रुपयांची वाढ होईल. संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून जाणून घेवूयात. (7th Pay Commission)

 

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता (dearness allowance) हा कर्मचार्‍याच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग असतो. महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देते. याच्यात वेळोवेळी वाढ केली जाते. पेन्शनधारकांना हा लाभ महागाई सवलत (DR) म्हणून दिला जातो.

 

34 टक्के DA चे कॅलक्युलेशन

जर एखाद्याला किमान बेसिक सॅलरी 18,000 रुपये मिळत असेल तर एकुण वार्षिक महागाई भत्ता 73,440 रुपये होईल. परंतु फरकाबाबत बोलायचे तर सॅलरीत वार्षिक वाढ 6,480 रुपये होईल. तर 56900 रुपये बेसिक सॅलरी असेल तर एकुण वार्षिक महागाई भत्ता 2,32,152 रुपये होईल. तसेच 20,484 रुपयांची वाढ होईल. येथे तुम्ही डीए कॅलक्युलेशन पाहून समजू शकता.

 

किमान बेसिक सॅलरीचे कॅलक्युलेशन

– कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 18,000 रुपये

– नवीन महागाई भत्ता (34%) 6120 रुपये/महिना

– आतापर्यंत महागाई भत्ता (31%) 5580 रुपये/महिना

– किती महागाई भत्ता वाढला 6120- 5580 = 540 रुपये/महिना

– वार्षिक सॅलरीत वाढ 540 X 12 = 6,480 रुपये

 

कमाल बेसिक सॅलरीचे कॅलक्युलेशन

– कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 56900 रुपये

– नवीन महागाई भत्ता (34%) 19346 रुपये / महिना

– आतापर्यंत महागाई भत्ता (31%) 17639 रुपये / महिना

– किती महागाई भत्ता वाढला 19346 – 17639 = 1,707 रुपये/ महिना

– वार्षिक सॅलरीत वाढ 1,707 X 12 = 20,484 रुपये

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission there will be a big increase in the salary of central employees there can be profit of more than 20 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा