Subhash Desai | मंत्री सुभाष देसाईंचा मोठा दावा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पळवापळवी झाली’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Subhash Desai | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी पुण्यात कार्यक्रमादरम्यान बोलताना शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीकास्त्र सोडले होते. मात्र या टीकेनंतर शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी पलटवार केला आहे. ‘केंद्राकडून निधीची कमतरता किंवा राज्याच्या वैभवाची पळवापळवी ही आजच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाही सुरु होती,’ असा जोरदार दावा सुभाष देसाई यांनी केला.

 

ADV

सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले की, ‘अमित शाहांनी काल राजकीय भाष्य केलं होतं. राज्याला गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार (Maharashtra Government) हतबल ठरतंय. पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने आणि गुजरातने थांबवावे. आम्ही कोरोना काळात 2 लाख कोटी रुपये आणलेत. केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जातोय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळातही पळवापळवी झाली. पण ते गप्प बसले. मात्र, आम्ही गप्प बसणार नाही. जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरु केले. जे चालतच नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

 

पुढे ते म्हणाले. ‘आईएफसी बाबतचा अधिकार फक्त मुंबईचाच आहे. सर्वात मोठी शेअर बाजार आर्थिक केंद्र मुंबईतच आहे.
जगातील सर्व देशांना त्यांच्या बँका किंवा त्यांचे मुख्यालय मुंबईतच सुरु करायचे असते.
काही दिवसांपूर्वी दोहा देशाने त्यांची बँक मुंबईतच सुरु केली.
आईएफसी केंद्र मुंबईत सुरू झालं तर ते जोरात चालेल. गुजरातच्या गिफ्ट शहरात ते चालत नाही.
मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र होण्याचा मार्ग अडवू नका.
जनतेमध्ये दुजाभाव का करता? महाराष्ट्राची जनता ही भारताची जनता आहे. अमित शाह यांनी दूजाभाव करु नये.
महाराष्ट्राला हक्काचा योग्य वाटा मिळणं आवश्यक आहे.

दरम्यान, ‘दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार (Central Government) निर्णय घेत नाही.
2014 ते 2021 पर्यंत केवळ 2 मेडिकल कॉलेज मंजूर. तिकडे उत्तर प्रदेशला मात्र 27 मेडिकल कॉलेज मंजूर झाली.
याकरता उत्तर प्रदेशला 2700 कोटी निधी देण्यात आला. तर महाराष्ट्राला केवळ 253 कोटी दिले गेले.
सर्वात अधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसिवीर (Remedesivir) दिले गेले.
महाराष्ट्राची 6340 कोटींची GST थकबाकी केंद्राकडे आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला तात्काळ मंजूरी द्या.
तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय.

 

 

Web Title :- Subhash Desai | shiv sena leader subhash desai reply to amit shah allegations on uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Earn Money | नोकरी सोडून 50 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना होईल 1 लाख रुपयांची कमाई, सरकार देईल 35% सबसिडी

Chris Lynn Girlfriend | ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटर क्रिस लिन करतोय योगा टीचरला डेट, सोशल मीडियावर झाले दोघांचे फोटो व्हायरल…

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दारुचे दुकान लुटले