7th Pay Commission | काय असते Pay Matrix ज्यामुळे कर्मचार्‍यांची वाढते सॅलरी, नवीन वर्षात वाढणार महागाई भत्ता!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees) नवीन वर्षाची भेट मिळू शकते. केंद्र सरकार कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते. तसेच तत्पूर्वी सरकार कर्मचार्‍यांचा थकित महागाई भत्ता (DA) देखील देऊ शकते. पे मॅट्रिक्सच्या आधारे पगार वाढतो. यापूर्वी कर्मचार्‍यांचे स्टेटस ग्रेड पेच्या आधारे निश्चित केले जात होते. Pay Matrix म्हणजे काय आणि ते कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेवूयात. (7th Pay Commission)

 

Pay Matrix म्हणजे काय
7th pay Commission आल्यापासून, केंद्रीय कर्मचार्‍यांचे ग्रेड पे द्वारे नाही तर Pay Matrix द्वारे ठरवले जाते. याद्वारे कर्मचारी त्यांचा वेतन स्तर तपासू शकतात. यासोबतच भविष्यात त्यांचा पगार वाढण्याची शक्यता काय आहे याचीही माहिती मिळू शकते.

 

त्यामुळे भविष्यात त्याचा किती फायदा होणार आहे, हे कर्मचार्‍यांना अगोदरच कळ शकते. कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतनाअंतर्गत पे मॅट्रिक्स लेव्हल 3 वरून मूळ वेतन निश्चित केले जाते. मूळ वेतन रचना 21,700 रुपयांपासून सुरू होते आणि 40 इन्क्रीमेंटसह 69,100 रुपयांपर्यंत जाते.

 

कशी होईल वाढ
जर एखादा कर्मचारी पे मॅट्रिक्स लेव्हल 3 अंतर्गत येत असेल, ज्याचा मूळ पगार 21,700 रुपये आहे, तर त्याचा पगार वाढू शकतो. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 31 टक्के दराने 6,727 रुपये असेल. तसेच दिल्लीत घरभाडे भत्ता 27% ने 5,859 रुपयांनी वाढेल आणि शहरानुसार प्रवास भत्ता 4,716 ने वाढेल. म्हणजेच कर्मचार्‍यांच्या मूळ पगारासह दरमहा 39,002 रुपये उत्पन्न असेल.

टेबलनुसार होते गणना
टेबलनुसार याची गणना होते. सिव्हिलियन कर्मचारी, संरक्षण दल आणि मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस (MNS) यांच्यासाठी स्वतंत्र वेतन मॅट्रिक्स तयार करण्यात आले आहे. शिफारशींनुसार प्रत्येक कर्मचार्‍याला लाभ मिळेल अशा पद्धतीने ही रचना करण्यात आली आहे.

 

7 वा वेतन आयोग ‘पे मॅट्रिक्स’चे फायदे

– 7 वा वेतन मॅट्रिक्स ग्रेड पे आणि पे बँड विलीन करण्यात मदत करते.

– पे मॅट्रिक्स लेव्हल वेगवेगळ्या पे बँडमधील अंतर कमी करते.

– 7 वा वेतन आयोग मॅट्रिक्स सुधारित वेतन निश्चित करते आणि पुढील गणनेची आवश्यकता नसते.
वेतन मॅट्रिक्स टेबल्सची सहजपणे गणना करता येते. ही त्रुटी मुक्त वेतन प्रणाली दर्शवते.

 

कर्मचार्‍यांचा वाढू शकतो डीए
नवीन वर्षात यावेळी कर्मचार्‍यांच्या भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
काही रिपोर्टवर विश्वास ठेवला तर पगारात तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
असे झाले तर आता कर्मचार्‍यांना 34 टक्के डीएच्या गणनेवरच पगार मिळणार आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission what is pay matrix which increases the salary of employees dearness allowance will increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे’वर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा (व्हिडीओ)

Chandrakant Patil | एसटी कामगारांच्या विलिनीकरणावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘नाही दे जा असं म्हणून…’

Post Office Schemes | पोस्ट ऑफिस रोज केवळ 50 रुपयांच्या बचतीवर देतंय 35 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?