Post Office Schemes | पोस्ट ऑफिस रोज केवळ 50 रुपयांच्या बचतीवर देतंय 35 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Schemes | पोस्ट ऑफिसमध्ये अनेक अशा योजना आहेत ज्यामध्ये पैशांची गुंतवणूक सुरक्षित राहते, आणि दुप्पट होऊ शकते. जर तुम्ही सुद्धा कमी जोखीमीच्या नफा किंवा गुंतवणूक पर्यायाचा शोध घेत असाल तर आम्ही आपल्याला पोस्ट ऑफिसच्या विशेष योजनेबाबत (Post Office Schemes) सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही कमी जोखमीवर जास्त नफा कमावू (Earn Money) शकता. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेची (Gram Suraksha Scheme) माहिती आज आपण घेणार आहोत. ग्राम सुरक्षा योजना एक असा पर्याय आहे, ज्यामध्ये कमी जोखमीत चांगले रिटर्न मिळवता येऊ शकते. ग्राम सुरक्षा योजनेच्या अंतर्गत बोनससह ठराविक रक्कम किंवा 80 वर्षाच्या वयावर किंवा निधनाच्या स्थितीत कायदेशीर वारसाला/नॉमिनीला (nominee) मिळते.

 

काय आहेत नियम आणि अटी?
19 ते 55 वर्ष वयोगटातील कुणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. किमान विमा रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता. प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक करू शकता.

 

प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सूट आहे. पॉलिसी कालावधीत प्रीमियम न भरल्यास बंद पडल्याच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियमचे पेमेंट करू शकतो. (Post Office Schemes)

कर्ज मिळते का? ग्राम सुरक्षा विमा योजना कर्ज सुविधेसह येते, जी पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनी मिळू शकते.
ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी कोणताही लाभ मिळणार नाही.
पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण इंडिया पोस्टद्वारे दिला जाणारा बोनस आणि अंतिम घोषित बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति 1,000 रुपये आहे.

 

मॅच्युरिटीवर बेनिफिट?
जर कुणी 19 वर्षाच्या वयात 10 लाखाची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षासाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये असेल.
पॉलिसी खरेदाराला 55 वर्षासाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल.
60 वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये होईल. (Benefits of Gram Suraksha Rural Postal Life Insurance Scheme)

 

कुठे मिळेल माहिती?
नामनिर्देशित व्यक्तीचे नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारख्या इतर तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास,
ग्राहक जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 वर किंवा
अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर देखील संपर्क करू शकतात.

 

Web Title :- Post Office Schemes | money earning 35 lakh rupees in post office gram surksha yojana invest just rs 50 daily

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime | धक्कादायक ! लग्न ठरवून ‘लिव्ह इन’मध्ये मारली ‘मज्जा’; हुंड्यासाठी दुसरीसोबत विवाह, पुढं भलतच घडलं

Nawab Malik-Nitesh Rane | नितेश राणे आणि नवाब मलिक यांच्यात खंडाजंगी ! फोटो मॉर्फ करुन परस्परांवर जोरदार टीकास्त्र

Covid Vaccination | ‘हर घर दस्तक’ ! चक्क उंटावरून बसून आरोग्य कर्मचारी करताहेत लसीकरण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले फोटो शेअर