7th Pay Commission | केंद्र सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षभेट; सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 7th Pay Commission | राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगांची तरतूद करण्यात आलेली आहे. महागाई आणि इतर बाबी लक्षात घेऊन शासन वेळोवेळी हे वेतन आयोग लागू करत असते. काही वर्षांपूर्वी देशात सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

 

वेतन आयोगानुर वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होत असते. नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागले आहेत. त्यातच आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. देशातल्या 52 लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ मिळणार आहे. (7th Pay Commission)

 

सातव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरवर २०२२ च्या अखेरीस सरकारकडून निर्णय घेणं अपेक्षित होते. पण काही कारणास्तव तो पुढे ढकलला गेला. आता नवीन वर्षात याबाबत निर्णय होऊ शकतो. त्याचप्रमाणे फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची मागणी लवकरच मान्य होऊ शकते. अशी माहिती मिळत आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारातील फिटमेंट फॅक्टरचे महत्व:
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात फिटमेंट फॅक्टरची भूमिका महत्वाची असते. यातल्या बदलांचा परिणाम संबंधित कर्मचाऱ्याच्या संपूर्ण पगारावर होतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टरनुसार पगार मिळतो. तो वाढवून 3.68 टक्के करण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत आहे. मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

 

फिटमेंट फॅक्टरबाबत अनेक बैठका पार पडल्या असून याबाबत काही ठोस निर्णय सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊ शकते. सरकारकडून याची अंमलबजावणी झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सध्या जनतेला खूश करता येईल असा अर्थसंकल्प करण्यावर सरकारचा पूर्ण भर आहे. (7th Pay Commission)

 

सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 18 हजार रुपये आहे.
फिटमेंट फॅक्टरवरच्या निर्णयानंतर ते 26 हजार रुपये होईल.
2.57 टक्के फिटमेंट फॅक्टरनुसार, सध्या 18 हजार रुपये मूळ पगारात
इतर भत्ते जोडून 18,000 X 2.57 या हिशेबाने 46 हजार 260 रुपये मिळतात.
फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के झाला तर कर्मचाऱ्यांना इतर
भत्ते जोडून पगार 26000 X 3.68 या हिशेबाने 95 हजार 680 रुपये पगार मिळेल.
याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
त्यावरून आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे नवे वर्ष गोड करणार का? याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | budget 2023 big announcement may be on 7th pay commission gh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | ‘भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हत’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Chhagan Bhujbal | ‘माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर…’, बावनकुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Pune Crime News | पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार (Video)