वाढदिवसानिमित्त फटाके उडवल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन-सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन मध्यरात्री एकच्या सुमारास गणपती मंदिर परिसरात वाढदिवसानिमित्त फटाके उडवल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आठही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.सुशिल प्रकाश थोरबोले, हर्षद पतंगराव किर्तक, सुहास राजेंद्र बाबर, दिग्वीजय राजेंद्र दुर्गे, प्रविण वसंतराव माळी, अथर्व पुरूषोत्तम जोशी, गिरीष अशोक रेंदाळकर, पवन केसरसिंग ठाकूर (सर्व रा. तासगाव) अशी त्यांची  नावे आहेत.

दरम्यान फिर्यादी पोलिस संग्राम अशोक कांबळे यांनी अटकाव केला पण तरुण मुले मध्यधुंद अवस्थेत होती. पोलिस संग्राम अशोक कांबळे यांनी फिर्याद दिली यामध्ये तासगाव गणपती मंदिर चौकात आरोपी हर्षध पतंगराव किर्तक, सुहास राजेंद्र बाबर, दिग्विजय राजेंद्र दुर्गे, प्रवीन वसंतराव माळी, अथर्व पुरषोत्तम जोशी, गिरीश अशोक रेंदाळकर व् इतर अनोळखी लोकांनी सर्व रा तासगाव जि सागंली जानुन  बुजून सार्वजनिक ठिकाणी रात्री फटाके जोरजोरात उडवले त्यांचे विरुद्ध उच्चन्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कलम आयपीएस १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर व पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास कुंभार हवालदार करत आहेत.

सुशिल थोरबोले याचा गुरूवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने त्याचे वरील सात मित्र गणपती मंदिर चौकामध्ये मध्यरात्री जमा झाले होते. याबाबत तासगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईचे तासगांव मधील नागरिकांनी स्वागत केले आहे. यापुढेही अशीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान पोलिसांचा नाईट राऊंड सुरू असताना गणपती मंदिर परिसरात फटाक्यांचा आवाज आला. त्यादिशेने जावून पाहणी केली असता त्याठिकाणी वरील आठ जण फटाके उडवत होते. पोलिसांकडून याप्रकरणी आठ जणांना रात्री ताब्यात घेण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्वानी पालन करावे रात्री अपरात्री फटाके कोणीही उड़वू नयेत ,तो कोणही असो त्याची गय केली जाणार नाही, त्याचेवर गुन्हे दाखल करणारच असे अशोक बनकर पोलिस उपाधीक्षक तासगाव यांनी सांगितले.