तृप्ती देसाईसह ‘भूमाता ब्रिगेड’च्या 8 समर्थक हैदराबाद पोलिसांच्या ‘ताब्यात’

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घराबाहेर निदर्शन करण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह 8 समर्थकांना तलंगणातील हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणातील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या मागणीसाठी तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिला समर्थक हैदराबादला गेल्या आहेत.

तृप्ती देसाई यांनी पुण्यातून हैदराबाद येथे गेल्या असून सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी तेलंगणा सरकारकडे केली आहेत. तृप्ती देसाईसह भूमाता ब्रिगेडच्या 8 महिला पदाधिकाऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई त्यांच्या निवासस्थानी गेल्या. याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी भूमाता ब्रिगेडने केली आहे.

तलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना लग्नसमारंभात जायला वेळ आहे, पण पीडित कुटुंबीयांना भेट देण्यास वेळ नसल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. महिलांच्या मुद्यावरून सातत्याने पुढाकार घेऊन आपली भूमिका तृप्ती देसाई मांडत असतात.

Visit : policenama.com