Coronavirus : कोल्हापूरमध्ये दिवसभरात 81नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात 81 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोल्हापूरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाय योजना करण्यात येत आहेत.

कोल्हापूरमध्ये आज सायंकाळी साडेसहा पर्यंत 81 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 468 वर पोहचली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये कसबा वाड्यातील बाधित रुग्णाचा समावेश असून अन्य दुसऱ्या रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात राज्यात 7975 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 233 जणांचा मृत्यूचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 640 इतकी झाली असून राज्यात रुग्ण वाढीचा दर 19.56 टक्के इतका आहे.गेल्या 24 तासात 233 जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूचा आकडा 10928 वर पोहचला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like