काश्मीर खोर्‍यात दगडफेक करणार्‍यांपैकी 83 % दहशतवादी : लष्कर

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी झालेले ८३ टक्के तरूणांनी दहशतवादाची वाट धरली आहे. दहशतवादाची वाट धरणारे हे दगडफेक करणारे तरुण असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. लष्करासह सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. नियंत्रण रेषेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून पाकिस्तानला काश्मीर खोऱ्यात शांतात भंग करू देणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली.

काश्मीरमधील सद्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी भारतीय लष्कर, सीआरपीएफ तसेच राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी जम्मू-काश्मीरमधील सद्य परिस्थीती आणि सुरक्षेसंबधीची माहिती देण्यात आली. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवला जाऊ शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. काश्मिर खोऱ्यात खबरदारी घेण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली असल्याचे जम्मू काश्मिरचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.

लष्कराने अमरनाथ यात्रेदरम्याने शोध मोहिम राबवली होती. या शोध मोहिमेदरम्यान एक दहशतवादी ठिकाण उध्वस्त करण्यात आले असून त्या ठिकाणाहून अमेरिकन बनावटीची एम २४ रायफल जप्त करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी बनावटीचे अँटी पर्सनल माइनही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असून यामागे पाकिस्तान आणि आयएसआयचा हात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे लेफ्टनंट जनरल सरबजीतसिंह ढिल्लन यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त