कॉंग्रेसची ३८ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि मणीपूर या ५ राज्यांतील आपल्या ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ नांदेड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमधून अशोक चव्हाण निवडणूक लढविणार आहेत.

कॉंग्रेस पक्षाने ५ राज्यातील ३८ उमेदवारांची यादी रात्री उशीरा जाहीर केली. त्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जून खरगे, दिग्विजय सिंह, हरिष रावत, आणि महाराष्ट्रातील अशोक चव्हाण यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मल्लीकार्जून खरगे कर्नाटकातील गुलबर्गा येथून, दिग्विजयसिंह मध्यप्रदेशातील भोपाळ येथून तर हरिष रावत हे नैनिताल उधमसिंग येथून निवडणूक लढणार आहेत. अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातून नांदेड येथून निवडणूक लढतील.

कॉंग्रेसने अद्याप पुणे, हिंगोली येथील उमेदवारीचा सस्पेंस अजून कायम ठेवला आहे. आज दिवसभरात याबाबत घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.