बिहारमध्ये ‘चमकी’ तापाचा ‘कहर’ सुरूच, ९३ बालकांचा मृत्यू

मुजफ्फरपूर : वृत्तसंस्था – बिहारच्या मुजफ्फरपूर व परिसरात चमकी तापाचा कहर सुरूच आहे. (अ‍ॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) आतापर्यंत ९३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

बिहार राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये ‘एक्यूट इन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ म्हणजेच एईएस (चमकी) आजराची साथ पसरली आहे. या भागातील उष्णतेच्या लाटेमुळे हा आजार मुलांना होत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, चमकी तापामुळे होणारे मृत्यू लिचीमुळे होत आहेत, असे काही अहवालांमध्ये नोंद करण्यात आले आहे. मुजफ्फरपूर लगत घेतल्या जाणाऱ्या लिचीच्या उत्पादनात काही विषारी घटक असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी श्रीकृष्णा मेडिकल कॉलेज आणि अन्य काही हॉस्पिटलचा दौरा केला. हर्षवर्धन यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार सुरू असलेल्या मुलांची विचारपूस केली.

चमकी तापाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या तापामुळे पीडित असलेली मुले ४ ते १४ वयोगटातील आहे. या तापामुळे आजारी असलेली बरीच मुले मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

सिने जगत –

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

‘या’ अभिनेत्याच लग्न होत, त्याच दिवशी वडिलांचं झालं होतं निधन

टिकटॉक कंपनीकडून युजर्संना ‘हे’ आवाहन