Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’चा हाहाकार सुरू ! गेल्या 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 9518 नवे पॉझिटिव्ह तर 258 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण देशात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनानं जवळपास सर्वच जिल्ह्यात शिरकाव केला आहे. कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोनानं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. गेल्या 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 9518 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत दिवसभरात 258 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळं सध्या राज्यातील काही मोठया शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.


शनिवारीच राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखाच्या पुढं गेली होती आज त्यामध्ये तब्बल 9518 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख 10 हजार 455 वर जावुन पोहचला आहे. दरम्यान, त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 69 हजार 569 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळं 258 रूग्णांचा मृत्यू झाल्यानं राज्यातील कोरोना बळींची संख्या आता 11 हजार 854 वर जावुन पोहचली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे मुंबईत आतापर्यंत तब्बल 70 हजार रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनानं सध्या हाहाकार केला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन मोठया प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये प्रशासनानं 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यातील इतर काही जिल्हयांमध्ये देखील लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे.