केंद्राच्या धोरणाविरूद्ध संरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संरक्षण मंत्रालयाच्या विविध संस्थांमधील ४ लाख कर्मचारी जानेवारी महिन्यांत ३ दिवसीय आंदोलन करणार आहेत. लष्कर, हवाई दल, वर्कशॉप, नवल डॉक्स आणि ४१ दारुगोळा फॅक्टरीमधील कर्मचारी २३ ते २५ जानेवारी दरम्यान आंदोलन करणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया डिफेंस एम्पॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सी. श्रीकुमार यांनी दिली. आज आम्ही केवळ जेवण सोडले. मात्र, सरकारने जर आमचे म्हणणे ऐकून न घेतल्यास जानेवारी महिन्यांत मोठे आंदोलन करू असे श्रीकुमार यांनी सांगितले.

रावसाहेब दानवेंमुळे भाजपमध्ये गुंडांचा प्रवेश : आ. गोटे यांचे आमदारांना खुले पत्र 

या आंदोलनाबाबत डायरेक्टर जनरल ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स कंपनीतील एका कामगार नेत्याने सांगितले की, सरकार आमच्या नोकऱ्या चोरत आहे. त्याचबरोबर रणनिती क्षेत्राच्या खासगिकरणाचा घाट घातला आहे. केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाला संधी मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या योजनांमधील निर्णयांपैकी २०० पेक्षा अधिक संरक्षणविषयक उपकरणांना नॉन कोर करण्यात होतो किंवा नाही. त्यामुळे या संस्थांकडे थेट बाजारातून खरेदी करु शकतात.

संरक्षण मंत्रालायाअंतर्गत येणाऱ्या या विविध संस्थांमधील लाखो कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास केंद्र सरकार अडचणीत येणार आहे. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अशाप्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने संरक्षण मंत्रालयही अडचणीत येणार असून विरोधकांना आयते कोलीत मिळणार आहे.