सर्वोच्च न्यायालयात आता महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

५ सप्टेंबर रोजी पूर्णपणे महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ न्यायदानासाठी बसणार आहे. न्या. आर. भानुमती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांचे पीठ या दिवशी सुनावणी घेणार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजातील २०१३मधील इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात एकाच वेळी तीन महिला न्यायमूर्ती असल्याचा योगही सध्या घडून आला आहे.
[amazon_link asins=’B07417987C,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’afe1bbce-ae90-11e8-9398-a31204418ac7′]

२०१३मध्ये संपूर्णपणे महिला न्यायमूर्तींच्या खंडपीठाने न्यायदान केल्याचा योग सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच आला होता. त्यावेळी न्या. ज्ञानसुधा मिश्रा आणि न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्या पीठाने न्यायदान केले होते. ऑगस्ट महिन्यात न्या. इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायमूर्ती असण्याची स्थिती निर्माण झाली आहे. न्या. बॅनर्जी या स्वातंत्र्योत्तर काळातील केवळ आठव्या महिला न्यायमूर्ती आहेत. विद्यमान महिला न्यायमूर्तींमध्ये न्या. भानुमती या सर्वात ज्येष्ठ असून १३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती. त्या १९ जुलै २०२० रोजी निवृत्त होणार आहेत.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a135192-ae91-11e8-ac06-01a487eafad6′]

न्या. फातिमा बिवी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या. त्यानंतर न्या. सुजाता मनोहर (८ नोव्हेंबर १९९४ ते २७ ऑगस्ट १९९९), न्या. रुमा पाल (२८ जानेवारी २००० ते २ जून २००६), न्या. ज्ञानसुधा मिश्रा (३० एप्रिल २०१० ते २७ एप्रिल २०१४), न्या. रंजना प्रकाश देसाई (१३ सप्टेंबर २०११ ते २९ ऑक्टोबर २०१४), न्या. आर. भानुमती (१३ ऑगस्ट २०१४ पासून), न्या. इंदू मल्होत्रा (एप्रिल २०१८पासून) आणि न्या. इंदिरा बॅनर्जी (ऑगस्ट २०१८पासून) यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पद भूषवले आहे.

उदयनराजेंकडून बापट यांना साताऱ्यातून खासदारकीची ऑफर