मिरजमध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मिरज परिसरात घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारावाई मिरजमधील मार्केट यार्ड परिसरात आज (बुधवार) करण्यात आली.

यासीन दस्तगीर शेख (वय -२४, रा. भंडारी बुवा चौक, मिरज)  असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोराचे नाव आहे.

[amazon_link asins=’B07CPS6LRD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’459b3f7a-7a29-11e8-a7b1-a10f5fd79bf2′]

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिले आहेत. त्यानुसार पिंगळे यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांचे एक पथक मिरज शहर परिसरात गस्त घालत असताना यासीन शेख मिरज मार्केट परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने मार्केटमध्ये धाव घेऊन शेखला सापळा रचून अटक केली. त्याच्याविरोधात मिरजेतील लोणार गल्लीतील बर्फ फॅक्टरीत चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पुजारी, सूर्यकांत सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.