दारू पिणार्‍यांसाठी खुशखबर… आता दारू मिळणार घरपोच

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

दारू पिणार्‍यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लवकरच एक धोरण राबविण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारूची डिलिव्हरी थेट घरपोच होणार आहे. ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हच प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार हे महत्वाचे पाऊल उचलणार आहे. हे धोरण अंमलात आणले गेले तर महाराष्ट्र हे घरपोच दारू पोहचविणारे देशातील पहिले राज्य बनणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b0520b9-cf83-11e8-907c-bd16f2ad2439′]

राज्याचे महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना ही माहिती दिली आहे. मद्यपान केल्यानंतर गाडी चालवल्यामुळे होणार अपघात टाळणे हा यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. एकुण अपघातांपैकी दारूच्या नशेत गाडी चालवून होणार्‍या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडतात. जशा इ-कॉमर्स वेबसाइट असतात तशाच माध्यमातून इतर वस्तु घरी येतात तशी दारूही घरपोच येणार आहे. दारू ऑनलाइन मागवण्यासाठी संबंधित ग्राहकांची सर्व माहिती (वयाचा दाखला, आधार क्रमांक) घेवुन ओळख पटवली जाईल असेही बावनकुळे यांनी सांगितले. सन 2015 मध्ये 4 लाख 64 हजार अपघात ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हिंगचे होते. त्यामध्ये जवळपास 6 हजार 295 जण जखमी झाले होते. दररोज 8 जणांचा मृत्यू हा दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होतो अशी आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, दारूबंदीची मागणी करणार्‍यांनी सरकारच्या या योजनेला मात्र कडाडून विरोध केला आहे.

शरद पवारांकडून पुन्हा मोदी सरकारचे कौतूक

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01M0JSAFU,B0784D7NFX,B077Q44DKY,B01FM7GGFI,B07DJHV6S7,B01DDP7D6W,B0745BNFYV,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’acd7cf90-cf83-11e8-9554-e579dcbebc96′]

 चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटला ७० हजार रुपयांचा ऐवज

 

बुलडाणा : घराची कडी तोडून २ चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला. रात्री २ वाजताच्या सुमारास खामगाव शहरातील तिरुपती नगरातही ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहर पोलिसांनी २ अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव शहरातील आदर्शनगर रोडवरील तिरुपतीनगर भागात सुभाष दिनकरराव तोमर आपल्या परिवारासह राहतात. रात्री १० वाजताच्या सुमारास घरातील हॉलमध्ये ते झोपले. त्यांची पत्नी आणि लहान मुलगा बाजूलाच हॉलमध्ये झोपले होते. मोठा मुलगा सोफ्यावर झोपला असताना रात्री २ चोरट्यांनी कडी तोडून घरात प्रवेश केला. आवाज ऐकताच जागी झालेल्या तोमर यांच्या छातीवर एका चोरट्याने प्रहार केला. तर दुसऱ्याने चाकुचा धाक दाखवून सुभाष तोमर यांच्या पत्नी शीतल तोमर यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, सोन्याचा हार, कानातले खडे, सोने-चांदीच्या दागिन्यांसह चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकुण ७० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY,B01FM7GGFI,B01M0JSAFU,B01DDP7D6W,B0745BNFYV,B07DJHV6S7,B0784D7NFX,B077Q44DKY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33251111-cf84-11e8-aee8-69f02e055861′]

रात्रीच्या अंधारात सुमारे २० मिनिटे हा थरार सुरू होता. याप्रकरणी सुभाष तोमर यांच्या तक्रारीवरून २ अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका संशयित आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक अकोलासाठी रवाना करण्यात आले. तर काही आरोपींची छायाचित्रांद्वारे ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.