२ पाक दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरमधील सुंदरबनी क्षेत्रात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घातले. या चकमकीत तीन भारतीय जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे.

कुलगाममध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक संपल्यावर झालेल्या एका स्फोटात तीन नागरिक मृत्युमुखी पडले. त्यानंतर दुपारी सुंदरबनी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. लष्कराने चोख प्रत्युत्तर देत घुसखोरी करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. यापैकी एकाकडून एके ४७ रायफल जप्त करण्यात आली.

तत्पुर्वी, शनिवारी रात्री पासून दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. ही चकमक रविवारी दुपारी संपली. कुलगाम येथील लारो परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली होती. एका घरामध्ये दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या घराल वेढा घातला होता.

पत्रकार खशोग्गींची हत्या ही आमची चूक : सौदी अरेबिया

त्यानंतर चकमकीला सुरूवात झाली होती. चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निकाल घोषित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांदरम्यान ही चकमक सुरू झाली होती. दोनच दिवसांपूर्वी जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यातील लष्करीतळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती जम्मू-काश्मिर पोलिसांनी दिली होती.