शेजाऱ्यांकडूनच सोन्याच्या दुकानात ‘गोळीबार’, थरारक व्हिडीओ CCTV मध्ये कैद

मुज्जफरनगर : वृत्तसंस्था- सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. हल्ली सोन्यांच्या दुकानांमध्ये झालेल्या अनेक चोऱ्यांबद्दल आपण ऐकले असेल. चोरी करताना चोर अनेक वेगवेगळ्या आयडिया लढवतात. मात्र आम्ही तुम्हाला एका अशा चोरीबद्दल सांगत आहोत जी ऐकून आणि व्हडिओ पाहून आपण थक्क व्हाल. आज भर दिवसा मुजफ्फरनगर मधील सिव्हिल लाइन भागात काल एका ज्वेलरी शॉपच्या मालकावर दोन व्यक्तींनी हल्ला केला. या वेळी त्यांनी काठीने दुकानाची प्रचंड तोडफोड केली. तसेच अत्याधुनिक पिस्तुलाचा वापर करत दुकानदाराला धमकावले. त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला.

दरम्यान हल्लेखोर हे दुकानमालकाचे शेजारीच आणि त्याचे दोन मुले असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारात दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुकानदार पूर्णतः घाबरून दुकानातच दडला. त्यानंतर हल्लेखोरांनी थेथून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

सशस्त्र हल्ला करूनही हल्लेखोरांनी चोरी न करता दुकानातून पळ काढला. त्यामुळे हल्ल्याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –