25 हजार रूपयाची पावती केल्यानं युवकानं जाळली स्वतःचीच दुचाकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे. हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली. परंतू दंड भरावा लागू नये म्हणून एका व्यक्तीने भर रस्त्यात स्वत:च्या गाडीलाच आग लावली. ही घटना दिल्लीत घडली.

दिल्लीत घडलेल्या या घटनेत एका वाहतूक पोलिसाने जेव्हा एका दारु पिऊन वाहन चालवणाऱ्याला थांबवले. त्यावेळी त्या व्यक्तीला 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे वाहन चालक राकेश नाराज झाला आणि त्याने दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून वाहनावर टाकले आणि आग लावून दिली.

वाहन चालकांच्या या भयानक प्रकारामुळे उपस्थित सर्व हैराण झाले. स्थानिक पोलिसांनी फायर ब्रिगेडला याची माहिती दिली, परंतू बाइक तोपर्यंत पूर्णता जळाली होती.

पोलिसांनी राकेशच्या विरोधात आयपीसी 453 अतर्गंत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, राकेश वाहन तपासणी दरम्यान दारु पिल्याचे आढळले. राकेशची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.