गाडी चालवून दाखवा मग ‘पावती’ फाडा, तरुणाचे पोलिसांना ‘चॅलेंज’

लखनऊ : वृत्तसंस्था – नव्या मोटार वाहन कायद्याची वाहन चालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. या कायद्यानुसार दंडाची मोठी रक्कम भरावी लागत असल्याने चालकांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे मोठ्या रकमेचे दंड झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पोलीस दमदाटी करून दंड वसूल करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच तरुणाने चक्क वाहतूक पोलिसांना चॅलेंज दिले आहे. त्याच्या या कृतीमुळे वाहतूक पोलिसांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
उत्तर प्रदेश वाहतूक पोलिसांनी एका मारूती बलेनो कारने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्याबद्दल पावती फाडली. पण यावेळी गाडीचा नंबर टाकण्यात चूक झाली. त्यांनी बलेनोऐवजी अल्टोच्या मालकाला पावती पाठवली. त्यानंतर मारूती अल्टोच्या मालकाने ट्विटवरून ट्रॅफिक पोलिसांना त्यांची चूक दाखवून दिली आहे.

दिल्लीमध्ये राहणाऱ्या कारचालकाने ट्विटरवून सांगितले की, त्याची गाडी नऊ वर्ष जुनी आहे. जर उत्तर प्रदेश पोलीस ही गाडी 144 किलोमीटर प्रतितास वेगाने चालवून दाखवणार असतील तर मी दोन हजार रुपयांची पावती फाडतो. या ट्विटनंतर ट्रफिक पोलिसांची फिरकी घेतली गेली. तरुणाने उत्तर प्रदेश पोलिसांना सांगितले की, मी अल्टो चालवतो, पोलिसांकडून चुकीचा नंबर टाकण्यात आला आहे.
कार चालकाने ट्विट केल्यानंतर अनेकांनी पोलिसांची टर उडवली आहे. तर काहींनी मजेशीर रिप्लीय दिला आहे. एकाने तर नंबर चुकीचा लिहला आहे का हे मला जाणून घ्यायचे आहे. उत्तर प्रदेश आहे… इथे काहीह चालते असा रिप्लाय एका कार चालकाने दिला आहे. तर काहींच्या मते पोलिसांकडून चुकीचा नंबर टाकण्यात चूक झाली असावी असे म्हटले आहे.

You might also like