बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वडवली येथील तिसरीत शिकणाऱ्या बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेह विहिरीत मिळून आला. साक्षी शंकर चिकणे असे त्या मुलीचे नाव आहे. वाईऐवजी सातारा येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर कसलाही घातपात झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9ad93935-d358-11e8-b7d6-9d5617aa1926′]

साक्षी ही घरासमोरील भैरवनाथ मंदिरासमोरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी तिचा रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेतला होता. ज्या विहिरीत मृतदेह सापडला, त्या विहिरीतही तिचा शोध घेतला होता. मात्र ती कुठेच मिळून न आल्याने वडील शंकर गणपत चिकणे यांनी वाई पोलीस ठाण्यात मुलीला अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. गेले तीन दिवस नातेवाईक व ग्रामस्थ साक्षीचा संपूर्ण परिसरात शोध घेत होते. गावापासून काही अंतरावर असलेल्या कमंडलू नदीलगतच्या गावाच्या विहिरीतही गेले तीन दिवस शोध घेतला जात होता. सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांनी विहिरीत पाहिले असता साक्षीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी विहिरीत पालापाचोळा पडू नये किंवा कसलीही दुर्घटना घडू नये यासाठी विहिरीवर कायमस्वरूपी लोखंडी जाळी बसवली होती. फक्त एक ठिकाणी तीन – चार फूट जागा मोकळी ठेवली होती. जाळी बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

[amazon_link asins=’B0751LW988′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a5acfb5b-d358-11e8-9611-d56c944eb052′]

ग्रामस्थांनी मृतदेह खाजगी वाहनाने वाईच्या ग्रामीण रूग्णालयात आणला. मात्र वाईच्या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे कराडवरून डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यानंतर साडेतीन वाजता वाई एमआयडीसीत साक्षीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. मात्र शवविच्छेदनात काहीच निष्पन्न न झाल्याने सातारच्या शासकीय रूग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिवंत अर्भकास उघड्यावर फेकले, उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू

मुलीचा मृत्यू विहिरीत बुडून झाल्याचे पोलिसांनी शवविच्छेदनानंतर सांगितले असले तरी या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. तीन दिवस नातेवाईक शोध घेऊनही तिचा मृतदेह सापडला नव्हता. शिवाय, ज्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला तेथे लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. तसेच तिच्या नातेवाईकांनी या विहिरीतही तिचा शोध घेतला होता. या सर्व परिस्थितीमुळे मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. परंतु, पोलिसांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे म्हणत प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.