मुकटी जवळ अज्ञात वाहन धडकेत एक ठार

धुळे: पोलीसनामा ऑनलाइन – एरंडोलहून सकाळीसचिन रमाकांत वैघ हे मोटरसायकलने काही कामकाज निमित्त धुळ्यात आले.कामकाज आटोपून देवपूरातील नकाणे रोड येथील नातेवाईकांच्या घरी भेट घेऊन परत दुपारी पारोळा रोडने परत एरंडोल कडे मोटरसायकलने जात असताना काटसर फाटा मुकटी गावा जवळ भरधाव येणाऱ्या अज्ञान वाहनाने धडक दिली.

या धडकेत सचिन रमाकांत वैद्य हे जागीच ठार झाले. अपघात पाहताच जवळ पास असलेल्या नागरीकांनी आरडा ओरड करत वाहन चालककाला थांबविण्याचा प्रयत्न केला.परंतू चालक वाहन घेऊन घटना स्थळाहून पसार झाला. महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
गावातील एका व्यक्तीने वाहनाचा नंबर पोलीसांना दिला आहे.

तालूका पोलीस स्टेशनला सदर अपघात बाबत गुन्हा नोंद करण्याचे काम उशीरा पर्यत सुर होते.