‘ट्रे’मध्ये नवजात बालिका आणि खांद्यावर ‘ऑक्सिजन’ सिलेंडर, हॉस्पिटलचा घेत होते शोध

पाटणा : बिहार राज्यातील आरोग्य व्यवस्था किती कोलमडलेली आहे, कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी सुमारे दीड तास लागल्याने यातच नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या मतदारसंघातील एका रुग्णालयात माणुसकीला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना घडलीय.

या घटनेत एका असह्य आईने आपल्या नवजात बालिकेला ट्रेमध्ये ठेवलेले आहे. वडील खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन या बालिकेला उपचार मिळावेत, म्हणून भटकत आहेत. एवढेच नाही, तर त्या रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे ‘त्या’ नवजात बालिकेला जीव गमवावा लागला आहे. यावरून बिहारची आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडून गेली आहे, हे स्पष्ट होत आहे.

सध्या या जोडप्याचे हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात रूग्णालयामध्ये आई-वडील आपल्या नवजात मुलीचे प्राण वाचवण्यासाठी कसे धावपळ करत आहेत? हे दिसून येत आहे. या छायाचित्रात वडिलांच्या खांद्यावर ऑक्सिजनचा सिलिंडर आहे, तर आईने हातात बालिकेचा ट्रे घेतला आहे.

23 जुलै रोजी हे छायाचित्र बक्सर या रुग्णालयात काढले होते. हे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले आहे. या बालिकेला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी कागदी कारवाईच्या विलंबामुळे या बालिकेचा जीव गेला. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची जबाबदारी उप विकास आयुक्त यांच्यावर सोपवली आहे.

राजपूरमधील सखुआना गावात राहणारे सुमन कुमार यांनी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी बक्सर रुग्णालयात दाखल केले होते. परंतु रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी प्रसूती करण्यास नकार दिला. त्यानंतर ते पत्नीसमवेत खासगी रुग्णालयात गेले. तेथेच डिलिव्हरी त्यांची पत्नीची प्रसूती झाली. परंतु जेव्हा बालिकेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा कर्मचार्‍यांनी नवजात बालकाच्या वडिलांच्या खांद्यावर ऑक्सिजनचे सिलेंडर दिले आणि नवजात मुलाला ट्रेमध्ये देऊन दांपत्याला पाठवले.

सुमारे 18 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर या असह्य जोडपे ‘त्या’ रुग्णालयात पोहोचले. तेथे कागदपत्राची पूर्तता करण्यास दीड तास लागल्याने याच काळात नवजात बालिकेचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाची निर्लज्जता येथे थांबली नाही. या दांपत्याला मृतदेहासह घरी पाठविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था केली नाही. यावेळी ‘त्या’ रुग्णालयात उपस्थित असलेल्या दुसर्‍या व्यक्तीने या घटनेची दोन छायाचित्रे काढून माध्यमांना दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.