उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीबद्दल प्रश्नचिन्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे अमित शाह यांची आज मातोश्री वर भेट होणार असल्याची खबर राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती . मात्र आता या दोघांच्या भेटीवर पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या अधिकृत मुंबई दौऱ्यात मातोश्री भेटीचा उल्लेख नसल्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची भेट होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. भाजपकडून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या दौऱ्याच्या वेळापत्रकात ‘मातोश्री’ भेटीची वेळ ठरली होती. त्यानुसार संध्याकाळी 7.30 वा. अमित शाह हे मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेणार होते. मात्र नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकात, मातोश्री भेटीचा उल्लेख नाही. त्यामुळे शिवसेनेच्या टीकेनंतर भाजपने अमित शाहांचा प्लॅन बदलला तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान ,आता अमित शहा मुंबई येथील दौऱ्याकरिता मुंबई विमानतळावर दाखल झाल्याचे वृत्त आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट कागदोपत्री का नाही याबाबत संभम आहे. दरम्यान ,सामाना मधून भाजपवर झालेल्या टीकेचा परिणाम या भेटीवर झाला असेल का? असा तर्क देखेल राजकीय वर्तुळात लावला जातोय.

अमित शाह आणि उद्धव ठाकरे भेटीमध्ये काय चर्चा होणार ?

मुंबई दौऱ्यात या गोष्टींचा समावेश

भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं मुंबई दौऱ्यानिमित्त ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान असले तरी लोकसभा निवडणुकीची तयारी हा त्यांचा प्रमुख अजेंडा असणार आहे.देशातील बुद्धिजीवी आणि नामवंत व्यक्तींच्या गाठी-भेटीनंतर अमित शहा आज संध्याकाळी राज्याच्या निवडणूक समितीची बैठक घेणार आहेत. या समितीत पक्षातील पहिल्या फळीतील 13 ते 14 सदस्यांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेली तयारी, लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा, उमेदवार छाननी, पालकमंत्र्यांचे दौरे, घटक पक्ष आणि विविध संघटनांची स्थानिक पातळीवरची स्थिती अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल.

अमित शहा, उद्धव ठाकरे भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

अमित शाह यांच्या दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक

दुपारी 12.30 – माधुरी दीक्षितशी भेट

दु. 1.45 – मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृहात विश्रांती

दु. 4.30 – उद्योगपती रतन टाटा यांची भेट

संध्या. 5.30 – पेडर रोड इथे लता मंगेशकर यांची भेट

6.45 – प्रभादेवी- सिद्धिविनायकाचं दर्शन

7.00 वा – वांद्रे- आशिष शेलार यांच्या निवासस्थानी भेट

9.45 वा – मलबार हिल – सह्याद्री अथितीगृहात मुक्काम

या दौऱ्यात मातोश्री भेटीचा उल्लेख नाही.

अमित शाह यांच्या दौऱ्याचं यापूर्वीचं वेळापत्रक

12 वाजता – मुंबई विमानतळावर आगमन

12:30 वाजता – मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.

1 वाजता – रंगशारदा येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक यांच्याशी चर्चा

3:30 वाजता – अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट

4:30 वाजता – भारतरत्न लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट

5:30 वाजता – उद्योगपती रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट

7:30 वाजता – मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट

9 वाजता – सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक

10:30 वाजता – वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्यासोबत चर्चा