स्वस्तात सोने देण्याच्या बहान्याने लुटणाऱ्या टोळीतील एका महिलेस अटक

मिरज : पोलीसनामा आॅनलाइन

मिरज तालुक्यातील आरग ते एरंडोली रस्त्यावर स्वस्तात सोने देण्याच्या बहान्याने दोघांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लुटलेल्या दोघांना मारहाण करुन दोन महिलांसह सहा पुरुषांनी पळ काढला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी विचित्रा संतोष काळे (रा. एरंडोली, ता.मिरज) हिला अटक केली आहे. याबाबत दत्तात्रय यशवंत जाधव (रा. हरिपूर) यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B07FH4PDHJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aa57f3d5-7ed3-11e8-85b8-29f1b91f79de’]

याबाबत सविस्तर माहिती अशी, की गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वस्त दरात सोने देतो अशी बतावणी करत दत्तात्रय जाधव (रा. हरिपूर) व त्यांचा मित्र बाळासाहेब मारुती शिंदे(रा. वळसंग, ता. जत) यां दोघांना दोन लाख रुपये घेउन आरग-एरंडोली रस्त्यावर बोलावून घेतले. त्याठीकाणी सहा पुरुष व दोन महिला होत्या. त्यांच्याकडे दोघांनी सोन्याची विचारपूस केली असता त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. दोन महिलांसह सहा पुरुषांनी त्या दोघांना मारहण केली व त्यांच्याकडील दोन लाख रुपयांसह, हातातील घड्याळ, सोने, मोबाईल असा एकून तिन लाख रुपयांचा एेवज घेऊन तेथून ते सर्वजन निघून गेले. याप्रकरणी पोलीसांनी आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सांगलिच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हा गुन्हा उघडकीस आणला असून विचित्रा संतोष काळे या महिलेला अटक केले आहे. तिची कसून चाैकशी केली असता तिने गुन्ह्याची कबूली दिली आहे. या गुन्ह्यातील आणखी सात फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.