महिलेनं LIVE दिला मुलाला जन्म, जगानं पाहिली गर्भातून बाहेर येणाऱ्या नवजात अर्भकाची चित्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये लोकांनी अशा गोष्टी केल्या ज्याचा त्यांनी कधीही विचार केला नव्हता. लोकांनी त्यांचे छंद जोपासले. दरम्यान या लॉकडाऊनमध्ये एक आई देखील होती, जिने असा निर्णय घेतला. ज्याचा परिणाम खूप धोकादायक देखील असू शकला असता. हा निर्णय घरी मुलाला जन्म देण्याचा होता. होय एक ऑस्ट्रेलियन आई, जिची प्रसूती इन्स्टाग्रामद्वारे लाइव्ह दाखवली गेली. आणि ती ६ हजार लोकांनी पाहिली.

पाच मुलांची आई असलेल्या एम्मा यांना जगासमोर आपल्या सहाव्या मुलाला जन्म द्यायचा होता. त्यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टही लिहिली. एम्मा म्हणाल्या की, जेव्हा त्यांच्या पाचव्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्या मुलाची प्रसूती लाइव्ह दाखवावी अशी त्यांची इच्छा होती.

त्यांनी लिहिले होते, मित्रांनो आज रात्री आमच्या घरी काहीतरी घडणार आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि घरातील कुत्रा देखील या क्षणाचे साक्षीदार होते. पहाटे पाच वाजता त्यांनी मुलाला जन्म दिला.

बाळंतपणापूर्वी एम्मा यांच्या मुलांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हार घातला. प्रत्येक क्षणी कुटुंब एम्मासह उपस्थित होते. एम्मा म्हणाल्या की, जेव्हा त्यांच्या पाचव्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या मुलाची प्रसूती व्हावी अशी त्यांची इच्छा होती.

एम्मा आई होण्यापूर्वी आणि मुलाला जन्म देण्यास फार घाबरल्या होत्या. एम्मा यांनी त्यांच्या भीतीवर विजय मिळवत घरी त्यांच्या सहाव्या मुलाला जन्म दिला आणि म्हणाल्या की आता भीती संपली आहे.