मोदी सरकारकडून मोठा निर्णय लवकरच, बँकेत मोठी रक्‍कम ‘आधारकार्ड’व्दारेच जमा होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. आता तुम्हाला केवळ पॅनकार्ड दाखवून मोठी रक्कम काढता किंवा जमा करता येणार नाही. अर्थव्यवस्थेत नोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी आता यापुढं ग्राहकांना पॅनकार्ड सोबतच आधार कार्ड देखील द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता यापुढे बँकेत मोठी रक्कम जमा करताना तुम्हाला दहावेळा विचार करावा लागणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जर तुम्ही वर्षभरात मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करणार असाल तर तुम्हाला यापुढे आधार कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे.

मोदी सरकार लेने वाली है बड़ा फैसला, बैंक में मोटी रकम आधार से होगी डिपॉजिट

केंद्र सरकार अर्थव्यवस्थेतून नोटांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार करत आहे. यामार्फत ग्राहकाला बायोमेट्रिक टूल किंवा वन टाइम पासवर्डच्या मदतीने केवायसी करावी लागणार आहे.

मोदी सरकार लेने वाली है बड़ा फैसला, बैंक में मोटी रकम आधार से होगी डिपॉजिट

मोदी सरकारने यासाठी संशोधन सुरु केले असून याआधी विदेशी रकमेसाठी देखील तुम्ही केवळ पॅनकार्ड दाखवून रक्कम काढू किंवा जमा करू शकत होतात. यापुढे आता तुम्हाला केवळ आधार कार्ड चालणार नाही तर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन देखील करावे लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार विचार करत आहे कि, नागरिकांनी जास्त प्रमाणात रोख रकमेचा वापर टाळायला हवा. त्यासाठी एक निश्चित सीमा आखण्याची सरकारची योजना आहे. मात्र ही रक्कम किती असावी याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र २० ते २५ लाख रुपयाच्या रकमेसाठी आधार ऑथेंटिकेशन करणे सक्तीचे राहील असे सांगितले जात आहे. त्यामुळे यापुढे खोट्या पॅनकार्डद्वारे केली जाणारी फसवणूक टाळता येऊ शकते.

मोदी सरकार लेने वाली है बड़ा फैसला, बैंक में मोटी रकम आधार से होगी डिपॉजिट

दरम्यान, आर्थिक व्यवहारांबरोबरच आता प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये देखील केवळ पॅनकार्ड आणि आधारकार्ड देउन काम चालणार नाही तर प्रॉपर्टीच्या नोंदणीवेळी आधार ऑथेंटिकेशन देखील करावे लागणार आहे. मात्र या गोष्टींची अद्याप पर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही.

मोदी सरकार लेने वाली है बड़ा फैसला, बैंक में मोटी रकम आधार से होगी डिपॉजिट

आरोग्यविषयक वृत्त –