Aadhaar-Voter ID Card | वोटर आयडी कार्डसोबत जोडले जाणार आधार कार्ड, 1 ऑगस्टपासून सुरू होणार मोहीम, महाराष्ट्र असेल पहिले राज्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar-Voter ID Card | निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत आधार कार्ड (Aadhaar Card) ओळखपत्राशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाची ही मोहीम पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. त्याची सुरुवात 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रातून होणार आहे. मोहिमेबाबत निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, आधार कार्डमुळे मतदाराची ओळख पटवणे सोपे होईल. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर पर्याय म्हणून 11 कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी 1 जानेवारी रोजी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मतदान करण्यास पात्र मानले जात होते, परंतु आता प्रत्येक तिमाहीला मतदार पात्र मानला जाईल. (Aadhaar-Voter ID Card)

 

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) म्हणाले की, आता मतदारांची ओळख पटविण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केले जाईल. ते म्हणाले की, असे करण्यामागे एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करणे हे देखील आहे. सरकारने निवडणूक कायद्यात केलेल्या दुरुस्तीमध्ये ही प्रणाली सक्तीने न करता स्वेच्छेने लागू करण्यात आली आहे. म्हणजेच, जर एखाद्याला त्याचे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करायचे नसेल, तर त्याला एक वैध कारण द्यावे लागेल. (Aadhaar-Voter ID Card)

 

काँग्रेसने दिले या मोहिमेला आव्हान
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कायदा (दुरुस्ती) कायद्याला आव्हान देणारे काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना सोमवारी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने सुरजेवाला यांच्या वकिलाला विचारले की त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात धाव का घेतली नाही. खंडपीठ म्हणाले, तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात का जात नाही? तुमच्यासाठी समान उपाय असेल. तुम्ही निवडणूक कायदा (सुधारणा) कायदा, 2021 च्या कलम 4 आणि 5 ला आव्हान देत आहात. इथे का आलात? तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात जाऊ शकता.

काँग्रेस नेत्याची बाजू मांडणार्‍या वकिलांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यांत तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
खंडपीठाने सांगितले की, कायद्यात उपलब्ध उपाय लक्षात घेऊन,
आम्ही याचिकाकर्त्याला कलम 226 (संविधानाच्या) अंतर्गत सक्षम उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य देतो.
सर्वोच्च न्यायालय निवडणूक (सुधारित) कायदा 2021 चे कलम 4 आणि 5 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या
सुरजेवाला यांच्या याचिकेवर सुनावणी करत होते.

 

याचिकेत म्हटले आहे की दुरुस्तीचा हेतू, दोन पूर्णपणे स्वतंत्र कागदपत्रे (त्यांच्या डेटासह)
म्हणजे निवासाचा पुरावा (कायमचा किंवा तात्पुरता) – आधार कार्ड आणि नागरिकत्वाचा पुरावा – मतदार ओळखपत्र जोडणे आहे.
त्यामुळे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे हे पूर्णत: तर्कहीन असल्याचे स्पष्ट होत असून,
हे असंवैधानिक आणि घटनेच्या विरोधात असल्याचे जाहीर करण्याची विनंती करण्यात आली.

 

Web Title :- Aadhaar-Voter ID Card | aadhar card will be linked with voter id card from august 1 maharashtra will be the first state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘शिंदे-फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का?’ – अजित पवार

 

LIC Policy | या पॉलिसीत मिळेल किमान 22 लाखांचे संरक्षण, सोबतच अनेक लाभ, जाणून घ्या सविस्तर

 

Pune Crime | दुर्दैवी! आजोबांसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीचा डंपरच्या धडकेत मृत्यू