Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार (दि. 19) पासून नागपुरात सुरू झाले आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे अधिवेशन नागपुरात होऊ शकले नाही. त्यामुळे आता दोन वर्षांनी पहिल्यांदाच नागपुरात अधिवेशन होत आहे. यावेळी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला अनेक मुद्यांवरून घेरणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, बेकारी, ओला दुष्काळ, प्रकल्पांची पळवापळव आदी मुद्दे आहेत. आता त्यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

सीमाप्रश्नावर कर्नाटक आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक भूमिका घेत आहेत. पण आपले सरकार कोणतीही भूमिका घेत नाही, कारण हे घटनाबाह्य सरकार आहे. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प पळवले गेले, त्यावर देखील काही बोलले जात नाही. मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले होते. माझ्यासोबत त्यांनी माध्यमांसमोर येऊन चर्चा करावी. पण अद्याप त्यांनी ती केली नाही. राज्यात दोन महिन्यापूर्वी मोठा पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या वर्षी ओला दुष्काळ आहे. तरी देखील राज्य शासन शांत आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. हे सरकार घाबरट आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यावर आपले दोन मंत्री घाबरून तिकडे गेले नाहीत. हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार, असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले.

दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात कलगी तुरा रंगण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांकडे राज्य सरकार घेरण्यासाठी विविध मुद्दे आहेत.
त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विधाने, भाजपच्या नेत्यांची विधाने, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न,
ओला दुष्काळ, बेकारी, महागाई, मंत्रिमंडळ विस्तार, सरकारची कर्नाटक प्रश्नावर मवाळ भूमिका आदी मुद्दे आहेत.
तसेच मागासवर्गिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देखील रखडली आहे. त्यामुळे सरकारला विरोधक कैचीत पकडण्याची शक्यता आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने देखील कंबर कसली आहे.

Web Title :- Aaditya Thackeray | aaditya thackeray criticized cm eknath shinde over maharashtra karnatak dispute project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम

Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट