Aaditya Thackeray | गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्या आजोबांना…

मुंबई : मुंबईकरांसाठी लढत असताना माझ्यावर गुन्हे दाखल झाले असतील, तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता अशीच ही घटना आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. मुंबईतील डिलाईल रोड येथील उड्डाणपुलाच्या एका लेनचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विनापरवानगी केले होते. यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री डिलाईल रोड येथील उड्डाणपुल येथे आदित्य ठाकरे काही नेत्यांसह गेले आणि तेथील बॅरिकेट्स बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यानंतर आदित्य ठाकरे, सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) एका अधिकाऱ्याने एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात (NM Joshi Marg Police Station) तक्रार दाखल केल्याने तिघांवर कलम १४३, १४९, ३२६ व ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

https://twitter.com/ANI/status/1725808576051183618?s=20

या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर काही गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मुंबईकरांच्या हक्कांसाठी लढण्याताना दाखल झाले आहेत. डिलाइल रोडची १२० मीटरची एक लेन तयार असून १० ते १५ दिवसांपासून बंद ठेवली होती. कारण इथल्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करण्यासाठी वेळ नव्हता. तिथल्या रहिवाशांना, काम करणाऱ्या लोकांना अनेक वर्षं तो त्रास होता.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पुढे म्हणाले, आम्ही परवा रात्री तिथे जाऊन बॅरिकेट्स बाजूला करून पुढे चालत गेलो. फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे सांगितले. ही बाजू १०-१५ दिवसांपासून तयार होती.
चाचण्या वगैरे सर्व होऊनही उद्घाटन कधी करायचे त्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे मुंबई महानगर पालिका थांबली होती.
आम्ही तिथे जाऊन मोठ्या अभिमानाने उद्घाटन केलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांसाठी लढत असताना माझ्यावर गुन्हे दाखल झाले असतील,
तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता अशीच ही घटना आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले,
सर्वात आधी पालिकेत जाऊन अतिक्रमण करून बसलेल्या पालकमंत्र्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत?
पालिका आयुक्तांना बढती हवी असल्याचे आम्ही ऐकले. गेल्या वर्षभरात पालिकेतील भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणला.
या सगळ्या घोटाळ्यांवर त्यांची सही आहे. अशा व्यक्तीला बढती मिळणार आहे का?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोठी बातमी : अंजली दमानिया भुजबळांविरूद्ध करणार होत्या मोठा खुलासा, तत्पूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात