Aaditya Thackeray | मंत्रीमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले; म्हणाले…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Aaditya Thackeray | शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर सेनेत दोन गट पडले गेले. यानंतर मात्र दोन्ही गट एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत. त्यातच शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारवर मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून जोरदार टीका केली.

 

नाशिक जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या (Shivsamvad Yatra) दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यात आले असता, एका जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सध्या राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही. तुम्ही लिहून घ्या. हे सरकार तर पडणारच आहे. पण पडण्याआधी विस्तार (Cabinet Expansion) होणार नाही. फक्त सगळ्या आमदारांना मंत्रीपदाची गाजर देऊन ठेवली आहेत. पण आता एकही नवीन मंत्री बनणार नाही. या मंत्रीमंडळात कुणी तरूण शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा किंवा महिलांचा आवाज ऐकणारा नाही. हे सरकार नेमके चालणार कसे? हे सरकार नेमके कुणाचे आहे. दिल्लीश्वरांचे की महाराष्ट्राचे? हा प्रश्न पडला आहे. असा घणाघात यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

दरम्यान, जे सरकारमध्ये बसलेत, ते स्वतःसाठी रोजगार शोधत आहेत. स्वतःसाठी दिल्लीवारी करत आहेत. स्वतःसाठी सुरतेला जातात, स्वतःसाठी गुवाहटीला जातात. झाडे, डोंगर बघून येतात. पण लोकांसाठी काहीही मागितलेले तुम्ही कधी ऐकलेयं का, की मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) लोकांसाठी दिल्लीला गेले आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी मागितलं आहे. कारण असे घडलेच नाही. हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या. मुख्यमंत्री फक्त स्वतःसाठी दिल्लीत जातात लोकांसाठी जात नाहीत. अशा शब्दात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

 

तर, नाशिक येथे येत असताना एका पेट्रोल पंपावर थांबलो असता,
अनेक लोक गाडीच्या काचेवर टकटक वाजवून मला सांगायचे की, आदित्यजी तुमचे सरकार परत आले पाहिजे.
कारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच बघितला नाही.
अनेक लोकांचे म्हणणे असते की माझ्या जिल्ह्यात काम झाले पाहिजे.
पण उद्धव ठाकरे आणि माझा असा कोणताच जिल्हा नसल्यामुळे आणि अख्खा महाराष्ट्रचं आमचा जिल्हा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती व्हावी,
शास्वत विकास व्हावा, उद्योग चांगले यावेत. यासाठी आम्ही काम करत होतो. असे देखील यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले.

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | shiv sena thackeray group aaditya thackeray criticised cm eknath shinde govt and group in shiv samvad yatra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री; मिळविला ‘या’ जागेवर विजय

Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा

Kiara Advani – Sidharth Malhotra | सिद्धार्थ-कियाराचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; बॉलिवूड गाण्यांवर थिरकले कपल